नागपूर: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत (Dr ) यांना करोनाची (Corona) लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यांची आरटीपीसीआर चाचणी (RTPCR Test) पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांना तातडीने नागपुरच्या किंग्जवे रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर तेथे उपचार सुरू करण्यात आले असून त्यांची प्रकृती ठीक असल्याची माहिती राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे देण्यात आली आहे. ( chief dr mohanji bhagwat tested corona positive he admitted in kigsway hospital in nagpur)
सरसंघचालक मोहन भागवत यांना काल शुक्रवारी सर्दी आणि खोकल्याचा त्रास जाणवू लागला. त्यानंतर त्यांची तातडीने चाचणी करण्यात आली. त्यांची आरटीपीसीआर चाचणी पॉझिटीव्ह आल्यामुळे त्यांना नागपूरच्या किंग्जवे हॉस्पिटल येथे भरती करण्यात आले आहे.
भागवत यांना करोना झाल्यानंतर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी ट्विट केले आहे. गडकरी आपल्या ट्विटमध्ये म्हणतात की, ‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालत आदरणीय डॉ. मोहनजी भागवत हे करोना पॉझिटिव्ह असल्याचे वृत्त आहे. लवकरात लवकर त्यांना बरे वाटावे, अशी देवाकडे प्रार्थना करतो.’
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times