मुंबई: राज्य शासनाने संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्याच्या उद्देशाने विविध क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी अनिवार्य केली होती. त्या आदेशात सुधारणा करण्यात आली असून आता आरटीपीसीआर चाचणीसोबतच ॲन्टीजन चाचणीही ग्राह्य धरण्यात येणार आहे. आजपासून (दि. १० एप्रिल) हा आदेश लागू असणार आहे. दरम्यान, यासोबतच आणखीही काही सुधारणा करण्यात आल्या आहेत. ( )

वाचा:

आपत्ती व्यवस्थापन, मदत तथा पुनर्वसन विभागाचे प्रधान सचिव असीम कुमार गुप्ता यांनी नवीन सुधारणांचे आदेश काढले आहेत. राज्यात करोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने राज्य शासनाने ‘ ’ मोहीम घोषित करून काही निर्बंध लावले आहेत. यामध्ये करोना लस न घेणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी आरटीपीसीआर चाचणी करणे अनिवार्य करण्यात आले आहे. तसेच त्याची वैधता पंधरा दिवस ठरविण्यात आली आहे. आता यात सुधारणा करण्यात आली असून आजपासून आरटीपीसीआर चाचणीला पर्याय म्हणून चाचणीही ग्राह्य धरण्यात येणार आहे.

वाचा:

सार्वजनिक वाहतूक, खासगी वाहतूक, चित्रपट, जाहिरात आणि चित्रवाणी मालिकांसाठी चित्रीकरण करणारे कर्मचारी, होम डिलिव्हरी सेवेमधील कर्मचारी, परीक्षा कार्यातील सगळे कर्मचारी व अधिकारी, लग्न समारंभातील कर्मचारी, अंतिम संस्कार करणारे कर्मचारी, खाद्य विक्री करणारे विक्रेते व कर्मचाची तसेच इतर कर्मचारी तथा कारखान्यातील कामगार, ई-कॉमर्स मधील व्यक्ती, बांधकाम क्षेत्रातील कर्मचारी आदींचा यात समावेश आहे.

वाचा:

आता या शासकीय सेवांना मुभा

सुधारित आदेशानुसार आपले सरकार सेवा केंद्र, सेतू, सीएससी सेवा केंद्र, सेतू केंद्र, पारपत्र सेवा केंद्र आणि एक खिडकी सुविधा उपलब्ध करून देणाऱ्या शासकीय सेवा यांना सकाळी सात ते रात्री आठपर्यंत कार्यालय उघडे ठेवण्याची मुभा देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे या अगोदर वृत्तपत्रांच्या बाबतीत जो निर्णय घेण्यात आला आहे, त्यात आता वृत्तपत्रांबरोबरच नियतकालिके, मॅगझिन व इतर प्रकाशनांचाही समावेश करण्यात आला आहे.

वाचा:

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here