म. टा. प्रतिनिधी, पुणेः वाढदिवसाला तलवारीने केक कापणाऱ्या एकाला गुन्हे शाखेच्या युनिट एकने अटक केली आहे. त्याच्याकडून तलवार जप्त करण्यात आली.

अरबाज अमीर खान (वय २२, रा. लोहियानगर) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. लोहियानगरमध्ये आरोपी अरबाजच्या मित्राचा वाढदिवस साजरा करण्यात आला होता. अरबाजने मित्राला केक कापण्यासाठी तलवार दिली होती. अरबाज दहशत करण्यासाठी तलवार घेऊन फिरत असल्याची माहिती गुन्हे शाखेतील युनिट एकचे पोलिस नाईक अमोल पवार यांना मिळाली. त्यानंतर सहायक आयुक्त सुरेंद्र देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक भरत जाधव, उपनिरीक्षक सुनील कुलकर्णी, अमोल पवार यांच्या पथकाने अरबाजला पकडले. त्याच्याकडून तलवार जप्त करण्यात आली आहे. पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी शहरातील गुंड टोळ्यांतील सराइतांवर कारवाईचे आदेश दिले आहेत. दहशत करणाऱ्या गुंडांवर नजर ठेवण्यात येत असून वाढदिवसाला तलवारीने केक कापणे तसेच समाजमाध्यमातील ‘स्टेटस’ वर शस्त्रांची छायाचित्रे ठेवणाऱ्यांविरोधात कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here