मुंबई: नांदेडमधील विधानसभा मतदारसंघातील आमदार यांचे करोनाने निधन झाले आहे. ते ५५ वर्षांचे होते. अंतापूरकर यांच्यावर मुंबई रुग्णालयात उपचार सुरू होते. तिथेच रात्री उशिरा त्यांची प्राणज्योत मालवली. ( Congress MLA )

वाचा:

रावसाहेब जयवंत अंतापूरकर यांचा करोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांच्यावर येथील रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र प्रकृती खालावल्याने त्यांना मुंबईत हलवण्यात आले होते. मुंबई रुग्णालय येथे त्यांच्यावर उपचार सुरू होते. तिथेच त्यांचे निधन झाले.

वाचा:

रावसाहेब अंतापूरकर हे यांचे अत्यंत विश्वासू सहकारी होते. अंतापूरकर यांच्या निधनानंतर चव्हाण यांनी ट्वीटरच्या माध्यमातून माहिती देताना आपल्या शोकभावना व्यक्त केल्या आहेत. ‘माझे निकटचे सहकारी व देगलूर विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेस आमदार रावसाहेब अंतापूरकर यांचे मुंबई हॉस्पिटल येथे थोड्या वेळापूर्वी निधन झाले आहे. रावसाहेब अंतापूरकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली व त्यांच्या कुटुंबीयांना हे अपरिमित दुःख सहन करण्याची शक्ती मिळो, ही प्रार्थना’, असे ट्वीट चव्हाण यांनी केले आहे.

महाराष्ट्राने दोन आमदार गमावले

रावसाहेब अंतापूरकर यांच्या रूपाने महाराष्ट्राने करोना संकटात दोन आमदार गमावले आहेत. याआधी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघांचे राष्ट्रवादीचे आमदार भारत भालके यांचा करोनाच्या विळख्यात सापडून मृत्यू झाला होता. भालके यांच्या निधनानंतर पंढरपूर मंगळवेढ्यात सध्या पोटनिवडणुकीची धामधूम सुरू असतानाच राज्याच्या विधानसभेने आपला आणखी एक सदस्य या साथीत गमावला. रावसाहेब अंतापूरकर यांच्या निधनाबद्दल तीव्र शोक व्यक्त करण्यात येत आहे.

वाचा:

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here