‌म. टा. प्रतिनिधी, मुंबई

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, लोकमान्य टिळक टर्मिनस, दादर, ठाणे, कल्याण, पनवेल या स्थानकांवरील प्लॅटफॉर्म तिकिटांची विक्री त्वरित थांबवण्याचे आदेश मध्य रेल्वेच्या वतीने देण्यात आले आहेत. पश्चिम रेल्वेवरील सर्व लोकल रेल्वे स्थानकातील विक्री ही बंद करण्यात आली आहे.

उपनगरी रेल्वे स्थानकातील फलाट तिकिटांबाबत अद्याप निर्णय घेण्यात आलेला नाही, अशी माहिती मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांनी दिली. गेल्या महिन्यात याच स्थानकातील फलाट तिकिटाची किंमत १० वरून ५० रुपये करण्यात आली होती.

वाचा:

महाराष्ट्रात जाहीर करण्यात आलेल्या संचारबंदी, जमावबंदी, लॉकडाउन या निर्बंधाच्या धर्तीवर परप्रांतीयांनी मूळ गावी परतण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान, या माहितीमध्ये तथ्य नसल्याचे रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. या कालावधीत म्हणजे उन्हाळ्यात नेहमी अशाप्रकारे आपापल्या गावाकडे परतणाऱ्यांची गर्दी असते. आत्ता होणारी गर्दीही तशीच असल्याचा दावा रेल्वे अधिकाऱ्यांनी केला आहे.

रेल्वे स्थानकातील गर्दीचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. तपासणीअंती गर्दीचे फोटो आणि व्हिडीओ गेल्यावर्षीचे असल्याचा दावा मध्य आणि पश्चिम रेल्वे प्रशासनाने केला. शेअर करणाऱ्या अज्ञातांविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. शहर पोलिसांकडून तपास सुरू असल्याची माहितीही रेल्वे अधिकाऱ्यांनी दिली.

सायबर पोलिसांकडे तक्रार
उन्हाळ्यात यूपी, बिहार या राज्यांसाठी जाणाऱ्या प्रवाशांची संख्या अधिक असते. यंदा ही तीच गर्दी आहे. रेल्वे गाड्या आणि स्थानकातील गर्दीचे जुने फोटो व्हायरल करणाऱ्याविरोधात सायबर पोलिसांकडे तक्रार करण्यात येईल, असे मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक संजीव मित्तल यांनी सांगितले.

वाचा:

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here