अमरावती: दोन मुलींची आई असलेल्या नागपूरमधील एका ३२ वर्षीय महिलेला ब्लॅकमेल करून व तिला एका खोलीत आठ दिवस डांबून ठेवत तिच्यावर वारंवार बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार गुरुवारी उघडकीस आला. पीडितेच्या तक्रारीवरून गाडगेनगर पोलिसांनी गुरुवारी रात्री येसुर्णा येथील नितीन श्रीधर थोरात (वय ३०) याला अटक करण्यात आली आहे. त्याच्याविरुद्ध युवकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नितीन थोरात व नागपूर येथील एका कंत्राटदाराच्या ३२ वर्षीय पत्नीची समाजमाध्यमावरून ८ ते ९ महिन्यांपूर्वी ओळख झाली होती. त्यानंतर संभाषण व भेटीगाठी हाेऊ लागल्या. ऑक्टोबर महिन्यात नितीन थोरात या महिलेला भेटण्यासाठी नागपुरात गेला. त्यावेळी सीताबर्डी परिसरातील एका लॉजवर नितीन व सदर महिला रात्रभर एकत्र राहिले होते. त्या ठिकाणी नितीनने महिलेसाबत शारीरिक संबंध ठेवले.

वाचा:

आठवडाभरापूर्वी नितीनने त्या महिलेला फोन केला. आपण लग्न करून व सोबत राहू असे सांगत शहरात बोलावले. मात्र महिलेने नकर दिला. त्यावेळी नितीनने त्या महिलेला सांगितले की, तुझा नागपूरच्या लॉजवरील अश्लील व्हिडिओ माझ्याकडे असून भेटायला न आल्यास हा व्हिडिओ व्हायरल करून तुझी बदनामी करेन, तसेच तुझ्या मुलीला मारून टाकेल. नितीनने लॉजवर काढलेला तो अश्लील व्हिडिओ महिलेला पाठवला. बदनामीच्या भीतीने ही महिला ३१ मार्चला एसटी बसने अमरावतीत आली. त्या ठिकाणी नितीन तिला घ्यायला गेला. त्यानंतर नितीन व ही महिला शहरातील महेंद्र कॉलनी भागातील एका खोलीवर पोहोचले. नितीनने ही खोेली भाड्याने घेतली होती. सुमारे आठ दिवस या महिलेला त्याने या खोलीवर डांबून ठेवले तसेच तिने कोणाशी संपर्क करू नये म्हणून तिच्या मोबाइलमधील सीमकार्ड काढून घेतले. या आठ दिवसात त्याने या महिलेवर वारंवार अत्याचार केला. गुरुवारी (दि. ८) दुपारी सदर महिलेने एका व्यक्तीच्या मोबाइवरून पतीसोबत नागपूरला संपर्क करून घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर तिचा पती नागपुरातून अमरावतीत पोहोचला. पोलिसांच्या मदतीने त्याने आपल्या पत्नीची सुटका केली. महिलेने दिलेल्या तक्रारीवरून गाडगेनगर पोलिसांनी नितीन थोरातविरुद्ध बलात्कार, धमकी देणे, अपहरण करणे आदी कलमान्वये गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे.

वाचा:

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here