विकेंड लॉकडाउनच्या पार्श्वभूमीवर महापौर पेडणेकर यांनी बॉम्बे रुग्णालयातील कोविड वॉर्डला भेट देऊन बेडची सद्यस्थिती जाणून घेत रुग्णांशी संवाद साधला. त्यावेळी सध्या राज्यात करोनावरील लसीच्या पुरवठ्यावरुन राजकारण रंगलं आहे. या वादावर किशोरी पेडणेकर यांनी भाष्य केलं आहे. ‘मुंबईत गळे काढणारे आता सांगतायेत की लस उपलब्धतेवरुन खोटे दावे केले जात आहेत. पण रुग्णालयातल लसीचा साठा शून्य, एक दिवसाचा किंवा दोन दिवसांचा साठा असं दाखवत आहेत. ते खोटं कसं होऊ शकते? इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात लस वाया जाण्याचं प्रमाणही कमी आहे. आकडेवारीवरून ते स्पष्ट झालं आहे, असा दावा त्यांनी केला आहे. तर, मुंबईकरांनो हात जोडून विनंती करते की या गळे काढणाऱ्यांकडे दुर्लक्ष करा, तुम्ही स्वतःची काळजी घ्या,’ असं किशोरी पेडणेकर यांनी म्हटलं आहे.
वाचाः
‘ऑफिसमध्ये बसून टीका करणं सोपं आहे. आमच्यासोबत कोविड वॉर्डमध्ये आयसीयूमध्ये जावून बघायला हवं. आघाडी सरकारला बदनाम करायचं. उद्धवजींच्या कामावर बोट ठेवायचं. ज्यांचा काडीचाही संबंध नाही, अशी लोकं बोलायला लागली आहेत,’ असा टोला पेडणेकर यांनी लगावला आहे.
मुंबईत रुग्णसंख्या वाढत असून करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी उपाययोजना सुरू आहेत. लक्षणं नसतानाही खासगी रुग्णालयात अनेक रुग्ण बेड अडवत आहेत. त्यांनी पालिकेच्या कोविड सेंटर्समध्ये यावे. ज्यांना आयसीयू बेडची नितांत गरज आहे, त्यांना ते बेड मिळाले पाहिजे, विनाकारण लक्षणे नसलेल्यांनी बेड्स अडवून ठेवू नये, कोणत्याही रुग्णालयाने बेड अडवून ठेवल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असं त्या म्हणाल्या आहेत. व्हेंटिलेटर आणि आयसीयूचे बेड गरजेप्रमाणे रुग्णांना मिळायला हवेत. त्यासाठी नियम पाळायला हवेत, असं आवाहनही त्यांनी केलं आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times