आज वाढदिवस असणाऱ्यांना यंदाचे वर्ष कसे जाईल, याचा धावता आढावा…
बुध आणि सूर्य या ग्रहांचा प्रभाव आपल्यावर वर्षभर राहील. फेब्रुवारी महिन्यात मित्रमंडळी, आप्तेष्ट, कुटुंबीय आपल्यासाठी शुभ चिंततील. मार्च व एप्रिल महिन्यात दिनक्रम व्यस्त राहील.
मे आणि जून महिन्यात हाती घेतलेल्या कामाच्या चांगल्या फलश्रुतीमुळे मन आनंदी आणि उत्साही राहील. जुलै व ऑगस्ट या कालावधीत कामाच्या नव्या संधी उपलब्ध होतील. सप्टेंबर महिन्यात व्यवसायाची गाडी रुळावर येईल. नोकरदार वर्गाला ऑक्टोबर महिना अनुकूल जाईल.
नोव्हेंबर महिन्यात कुटुंबाला जास्त वेळ देऊ शकाल. शिक्षण आणि विज्ञान क्षेत्रात असणाऱ्यांना हा महिना लाभदायक जाईल. डिसेंबर व जानेवारी २०२० या कालावधीत अडकलेली कामे पूर्ण होतील. महिलांसाठी हे वर्ष आर्थिक स्थिती मजबूत करणारे असेल. परीश्रमांशिवाय गत्यंतर नाही, याच भावनेने विद्यार्थ्यांनी मेहनत केल्यास अपेक्षित यश मिळेल.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times