मुंबई: ‘करोनाचं संकट युद्धापेक्षाही भयंकर आहे. करोनानं व्हीआयपी असो की सर्वसामान्य, कोणालाही सोडलेलं नाही. प्रसंग बाका आहे. त्यामुळं राजकीय फाटे फोडण्यापेक्षा सर्वांनीच राज्य सरकारला सहकार्य करण्याची भूमिका घ्यावी,’ असं आवाहन शिवसेनेचे खासदार यांनी केलं आहे. ()

वाचा:

राज्यात रुग्णांची संख्या सध्या झपाट्यानं वाढत आहे. दिवसा जमावबंदी व रात्री संचारबंदीचा पर्याय देखील फारसा परिणामकारक ठरलेला नाही. त्यामुळं राज्य सरकार काही दिवसांसाठी संपूर्ण लॉकडाऊन करण्याच्या विचारात आहे. त्यासाठीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज सर्वपक्षीय नेत्यांची बैठक बोलावली आहे. या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ‘सामना’च्या आज अग्रलेखातून राऊत विरोधी पक्ष भाजपवर सडकून टीका केली होती. मात्र, पत्रकारांशी बोलताना त्यांनी काहीसा नरमाईचा सूर लावला.

वाचा:

‘युद्ध किंवा नैसर्गिक आपत्तीप्रसंगी सर्व पक्षांची बैठक बोलावून सर्वांचं मत विचारात घेतलं जातं. ही आपल्या देशाची परंपरा आहे. देशाचे पंतप्रधान अधूनमधून अशा बैठका घेत असतात. मुख्यमंत्री सर्व पक्षांची बैठक घेणार असतील तर सर्वांनी सरकारच्या प्रयत्नांच्या पाठीशी उभं राहायला हवं. सरकार कमी पडत असेल तर सूचना कराव्यात. केंद्राकडून अधिक पाठबळ हवं असेल तर सर्वच पक्षाच्या नेत्यांनी केंद्राकडून मदत मिळवण्यासाठी सहकार्य करावं. विशेषत: देवेंद्र फडणवीस यांनी केंद्राकडं पाठपुरावा करायला हवा. कारण, तेही महाराष्ट्राचे नेते आहेत,’ असं राऊत म्हणाले.

…तर ती केंद्र सरकारची नाचक्की!

लसीच्या तुटवड्यावरून सध्या राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू असतानाच पुण्याला केंद्र सरकारनं थेट लस पुरवल्याचं ट्वीट महापौर मुरलीधर मोहोळ यांनी केलं आहे. असा थेट लसीचा पुरवठा करता येतो का, याबाबत विचारलं असता संजय राऊत म्हणाले, ‘राजकारण म्हणतात ते हेच. राज्य सरकार अधिकृतपणे मागणी करत असताना पुणे महापालिकेत एखाद्या विशिष्ट पक्षाची सत्ता आहे म्हणून त्यांच्यासाठी एखादा वेगळा नियम लावणं हा संपूर्ण राज्यावर अन्याय आहे. तसं खरोखरच होत असेल तर केंद्र सरकारची ती नाचक्की आहे.’

वाचा:

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here