वाचा:
लसीच्या पुरवठ्यावरून राज्य व केंद्र सरकारमध्ये सध्या आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. महाराष्ट्रात कोविड १९ चे सर्वाधिक रुग्ण असतानाही लस पुरवठ्याच्या बाबतीत केंद्र सरकार महाराष्ट्राला सापत्न वागणूक देत असल्याचं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटलं आहे. हाच मुद्दा पुढं नेत पृथ्वीराज चव्हाण यांनी लोकसभेत १० फेब्रुवारी २०२१ रोजी केंद्र सरकारनं सादर केलेली आकडेवारी जाहीर केली आहे.
वाचा:
या आकडेवारीनुसार, गुजरातला दर हजार करोना रुग्णांमागे ९६२३ ‘एन ९५ मास्क’ देण्यात आले आहेत, तर महाराष्ट्राला दर हजार रुग्णामागे केवळ १५६० मास्क देण्यात आले आहेत. इतकेच नव्हे, उत्तर प्रदेशला महाराष्ट्राच्या दुपटीनं मास्क मिळाले आहेत. पीपीई किटच्या बाबतीतही हेच चित्र आहे. गुजरातमध्ये दर हजार रुग्णांमागे ४९५१ पीपीई किट देण्यात आले आहेत. उत्तर प्रदेशला २४४६ पीपीई किट देण्यात आले आहेत, तर महाराष्ट्राला फक्त २२३ किट मिळाले आहेत.
व्हेंटिलेटर पुरवठ्याची आकडेवारी त्याहून धक्कादायक आहे. गुजरातला दर हजार रुग्णांमागे १३ व्हेंटिलेटर्स देण्यात आले आहेत. उत्तर प्रदेशला सात देण्यात आले आहेत, तर महाराष्ट्राला दर हजार रुग्णांमागे अवघे दोन व्हेंटिलेटर दिले गेले आहेत. केरळला तर केवळ एकच व्हेंटिलेटर देण्यात आलं आहे. करोना रुग्णांची संख्या कमी असतानाही वैद्यकीय उपकरणांच्या बाबतीत गुजरातला भरभरून देण्यात आलं आहे, असं पृथ्वीराज चव्हाण यांनी आपल्या प्रसिद्धिपत्रकात म्हटलं आहे.
वाचा:
‘हे भेदभावाचं राजकारण नाही तर दुसरं काय आहे? आपण गुजरात, उत्तर प्रदेश आणि भाजपशासित राज्यांचे नव्हे तर संपूर्ण भारताचे पंतप्रधान आहोत हेच मोदी विसरून गेले आहेत,’ अशी बोचरी टीका चव्हाण यांनी केली आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times