मुंबई : महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नई सुपर किंग्सच्या संघाने यावेळी पुणेकर ऋतुराज गायकवाडला संधी दिली आहे. त्याचबरोबर ड्वेन ब्राव्हो, सॅम करन, मोइन अली आणि फॅफ ड्यू प्लेसिस यांना संधी देण्यात आली आहे. दिल्लीच्या संघात यावेळी अजिंक्य रहाणे खेळणार आहे. त्याचबरोबर दिल्लीच्या डावाची ुसुरुवात यावेळी पृथ्वी शॉ करणार आहे. त्यामुळे मुंबईकर खेळाडू दिल्लीच्या संघातून खेळताना कशी कामगिरी करतात, याकडे सर्वांचे लक्ष असेल.

दिल्ली कॅपिटल्सच्या संघात यावेळी टॉम करनला संधी देण्यात आली आहे. आज तो पदार्पण करणार आहे. त्याचबरोबर टॉमचा भाऊ सॅम करन हा यावेळी चेन्नई सुपर किंग्सच्या संघात आहे. त्यामुळे हे दोन्ही भाऊ आता एकमेकांसमोर उभे ठाकले जाणार आहेत.

चेन्नईचे नेतृत्व महेंद्र सिंह धोनी तर दिल्लीचे नेतृत्व ऋषभ पंतकडे आहे. म्हणूनच या लढतीकडे गुरू विरुद्ध शिष्य असे पाहिले जात आहे. गेल्या सत्रात दिल्ली संघाने सर्वांना धक्का देत अंतिम फेरी गाठली होती. पण त्यांना उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. तेव्हा दिल्लीचे नेतृत्व श्रेयस अय्यरकडे होते. यावेळी दुखापतीमुळे तो संघाबाहेर आहे आणि नेतृत्व युवा फलंदाज आणि विकेटकिपर पंतकडे देण्यात आहे आहे. दिल्ली संघाचा विचार केल्यास भारतीय संघातील अनुभवी शिखर धवन, त्यानंतर पृथ्वी शॉ, अजिंक्य रहाणे, स्टीव्ह स्मिथ आणि पंत ही फलंदाजीची फळी आहे.

धवनने गेल्या हंगामात सर्वाधिक ६१८ धावा केल्या होत्या. तर शॉने विजय हजारे स्पर्धेत द्विशतकासह ८२७ धावांचा पाऊस पाडला होता. या शिवाय दिल्लीकडे मार्कस स्टोयेनिस, शिमरोन हेटमायर आणि सॅम बिलिंग्स सारखे अष्टपैलू आहेत. दिल्ली कॅपिटल्सकडे गोलंदाजीत इशांत शर्मा, कॅगिसो रबाडा, उमेश यादव, ख्रिस वोक्स आणि एनरिक नोजे ही दमदार फळी आहे. करोना क्वारंटाइनच्या नियमामुळे रबाडा आणि नोजे पहिल्या सामन्यासाठी उपलब्ध नसतील. फिरकीपटूमध्ये आर अश्विन आणि अमित मिश्रा यांच्यावर जबाबदारी असेल. अक्षर पटेलला करोना झाल्याने तो उपलब्ध नसेल. त्यमुळे दिल्लीची गोलंदाजी ीही थोडीशी कमकुवत दिसत आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here