राज्यात करोनाचा कहर अद्याप सुरुच आहे. मात्र, बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाणही दिलासा देणारे आहे. त्यामुळं प्रशासनाच्या प्रयत्नांना यश येत असल्याचं चित्र आहे. राज्यात गेल्या काहि दिवसांपासून ५० हजारांच्या वर रुग्णसंख्या आढळत होती. तर रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही कमी झाले होते. आज मात्र आज नवीन रुग्णांच्या तुलनेत बरे झालेल्या रुग्णांच्या संख्येतही वाढ झाली आहे. त्यामुळं थोडा दिलासा मिळाला आहे.
आज राज्यात ५३ हजार ००५ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. त्यामुळं राज्यात आजपर्यंत २७ लाख ४८ हजार १५३ करोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. त्यामुळं राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८२. १८ टक्के इतके झाले आहे.
वाचाः
गेल्या २४ तासांत राज्यात ३०९ करोनाबाधित रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. त्यामुळं सध्या राज्यातील मृत्यूदर १. ७२ टक्के इतका आहे. तर, राज्यात आजपर्यंत करोनामुळं मृत्यू झालेल्या रुग्णांचा आकडा ५७ हजार ६३८ इतका झाला आहे.
वाचाः
अॅक्टिव्ह रुग्णांचा आकडा चिंताजनक
राज्यातील अॅक्टिव्ह रुग्णांचा आकडा साडेपाच लाखांवर पोहोचला आहे. सध्या राज्यात ५ लाख ३६ हजार ६८२ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. त्यातील मुंबईत ८९ हजार ७०७ इतके आहेत. तर, ठाण्यात ७१ हजार ०६१ उपचाराधीन रुग्ण आहेत. तर, पुण्यात सर्वाधिक १०२११५ इतके अॅक्टिव्ह रुग्ण असून त्यांच्यावर राज्यातील विविध रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
वाचाः
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times