मुंबई : महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नई सुपर किंग्सला पहिल्याच सामन्यात पराभवाचा धक्का बसला. पण यावेळी चेन्नईच्या संघाकडून काही मोठ्या चुका झाल्या आणि त्यामुळेच त्यांना पराभव पत्करावा लागला.

चेन्नईचा संघ फलंदाजी करत असताना सुरेश रैना भन्नाट फॉर्मात होता. पुनरागमन करत असताना रैना दिल्लीच्या गोलंदाजीचा चांगलाच समाचार घेत होता. रैनाने पुनरागमन करताना यावेळी अर्धशतकही झळकावले. पण अर्धशतक झळकावल्यावर रैना धावचीत झाला आणि चेन्नईला मोठा धक्का बसला. ही धावचीत होण्याची चुक चेन्नईला चांगलीच महागात पडली.

चेन्नईच्या संघाने दिल्लीपुढे १८९ धावांचे दमदार आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना पृथ्वी शॉ हा आक्रमकपणे फलंदाजी करत होता. त्यावेळी पृथ्वीला चेन्नईच्या संघाने दोनवेळा जीवदान दिले. पृथ्वीचे दोन झेल यावेळी चेन्नईच्या खेळाडूंनी सोडले आणि ते त्यांना चांगलेच महागात पडले. या दोन जीवदानांच्या जोरावर पृथ्वीने चौकार लगावत आपले अर्धशतक साकारले. त्याचबरोबर ७२ धावांची तुफानी खेळी साकारत पृथ्वीने यावेळी दिल्लीच्या विजयाचा पाया रचला आणि चेन्नईच्या हातातून सामना हिरावून घेतला.

धोनीने यावेळी पृथ्वी शॉ आणि शिखर धवन खेळत असताना ड्वेन ब्राव्होला फार उशिरा गोलंदाजी दिली. पृथ्वी आणि धवन चेन्नईच्या गोलंदाजीचा समाचार घेत होते. त्यावेळी धोनीने ब्राव्होला एखाद-दुसरे षटक दिले असते तर कदाचित सामन्यात फरक पडू शकला असता. महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नई सुपर किंग्सला पराभवाचा धक्का बसला. कारण दिल्ली कॅपिटल्सच्या सलामीवीरांनी यावेळी शतकी भागीदारी रचत दिल्लीला सहजपणे विजय मिळवून दिला. या विजयासह दिल्लीच्या संघाने विजयी सलामी देत दोन गुणांची कमाई केली आहे. दिल्लीने यावेळी सात विकेट्स राखत चेन्नईवर सहज विजय साकारला.

ऋतुराज आणि फॅफ हे दोघेही सलामीवीर स्वस्तात बाद झाल्यावर मात्र सुरेश रैना फलंदाजीला आला आणि त्यानंतर चेन्नईची धावगती चांगलीच वाढायला लागली. रैनाने यावेळी सुरुवातीला मोइन अलीबरोबर चांगली भागीदारी रचली. मोइननेही यावेळी चांगले फटकेबाजी करत २४ चेंडूंत ३६ धावांची भर घातली. या दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी यावेळी ५३ धावांची भागीदारी रचली. रैनाने यावेळी षटकार फटकावत आपले अर्धशतकही यावेळी साजरे केले. पण अर्धशतक झळकावल्यावर रैनाला मात्र मोठी खेळी साकारता आली नाही. कारण जडेजाबरोबर खेळत असताना रैना रनआऊट झाला. पण बाद होण्यापूर्वी रैनाने यावेळी ३६ चेंडूंत तीन चौकार आणि चार षटकारांच्या जोरावर ५४ धावा केल्या. या सामन्यात रैनाची खेळी, हीच त्यांची जमेची बाजू ठरली.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here