वाचा:
पातुर येथील रहिवासी असलेल्या या ५७ वर्षीय रुग्णावर गेल्या काही दिवसांपासून अकोला शासकीय रुग्णालयातील वॉर्डात उपचार सुरू होते. मुख्य म्हणजे कोविडवर मात करण्यात या रुग्णाने यशही मिळवले होते. शनिवारी करोना चाचणी अहवाल निगेटिव्ह आला होता व त्याला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात येणार होता. मात्र त्याआधीच त्याने आपली जीवनयात्रा संपवली. वॉर्डातील इतर रुग्णांना संशय येवू नये म्हणून अंगावर चादर घेऊन सलाईनच्या नळीने रुग्णाने आपला गळा आवळला आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला. हा प्रकार काही वेळाने लक्षात येताच रुग्णालयात एकच खळबळ उडाली. वॉर्डातील इतर रुग्णांना हा प्रकार पाहून मोठा धक्का बसला.
वाचा:
रुग्णाच्या आत्महत्येचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसले तरी कर्करोगानेही ग्रस्त असलेल्या या रुग्णाने आजारपणाला कंटाळून आत्महत्या केली असावी असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला आहे. याप्रकरणी कोतवाली पोलिसांनी गुन्हा नोंदवला असून पुढील तपास सुरू आहे.
गुंतागुंत वाढत गेली आणि…
मिळालेल्या माहितीनुसार, या रुग्णाला अन्न नलिकेचा कर्करोग होता. येथे त्यांच्यावर उपचार करण्यात आले होते. हा कर्करोग चौथ्या स्टेजवर असल्याने प्रकृतीत विशेष सुधारणा झाली नव्हती. त्यानंतर डॉक्टरांच्या सल्ल्याने नातेवाईकांनी त्यांना तिथून हलवले होते. मुर्तिजापूर येथे त्यांना दाखल करण्यात आले होते. तिथे त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना अकोला शासकीय रुग्णालयात आणण्यात आले होते. त्यात त्यांची कोविड चाचणी पॉझिटिव्ह आली होती. ही गुंतागुंत वाढत असतानाच त्यांनी आपली जीवनयात्रा संपवली.
वाचा:
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times