नवी मुंबई: लांब पल्ल्यांच्या रेल्वे गाड्यांमध्ये दिल्या जाणाऱ्या सेवासुविधांविषयी अनेकदा तक्रारी येत असतात. मात्र, नुकतीच पुढं आलेली माहिती अत्यंत धक्कादायक आहे. तिरुनवेली-जामनगर एक्स्प्रेसमधील प्रवाशांना टॉयलेटमधील वॉश बेसिनचं पाणी पुरवल्याच्या संशयावरून एका रेल्वे कर्मचाऱ्याला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी संबंधित कर्मचाऱ्याला १० दिवसांची साधी कैद व १५०० रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.

वाचा:

(वय ३०) असं त्याचं नाव असून तो राजकोटचा रहिवासी आहे. रेल्वे प्रवाशांना होणाऱ्या बेकायदा पाणी विक्रीच्या प्रकारांना चाप लावण्यासाठी रेल्वे पोलीस दलानं व्यापक मोहीम हाती घेतली होती. या मोहिमेदरम्यान तिरुनवेली-जामनगर एक्स्प्रेसमध्ये पॅकबंद पाण्याची बेकायदा विक्री होत असल्याची माहिती रत्नागिरी रेल्वे पोलिसांना मिळाली. त्या आधारे पोलिसांनी कारवाई सुरू केली. संबंधित एक्स्प्रेसच्या एसी डब्यात पोलिसांनी तपासणी केली असता प्रवाशांनी अशुद्ध पाणी मिळाल्याची तक्रार केली. त्यानंतरच्या तपासात व्यास पकडला गेला, अशी माहिती कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडचे (केआरसीएल) प्रवक्ते गिरीश करंदीकर यांनी दिली.

वाचा:

आरोपी रवींद्र व्यास हा कंत्राटी कामगार आहे. त्याच्यावर भारतीय रेल्वे कायद्यातील कलम १४४ (१) नुसार बेकायदेशीर विक्रीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी रत्नागिरीच्या न्यायदंडाधिकाऱ्यांनी त्याला दंड व साधी कैद ठोठावली आहे.

वाचा:

‘केआरसीएल’चे विभागीय व्यवस्थापक उपेंद्र शेंडे म्हणाले, ‘व्यास हा मडगाव इथं गाडीत चढला. गाडीत तो बिनदिक्कत सील नसलेल्या पाण्याच्या बाटल्या प्रवाशांना देत होता. त्यामुळं संशय आलेल्या प्रवाशांनी लगेचच तक्रार केली. टॉयलेटमधील वॉश बेसिनचं पाणी त्यानं प्रवाशांना विकल्याचा संशय आहे.

वाचा:

Ratnagiri News in Marathi, रत्नागिरी न्यूज़, Latest Ratnagiri News Headlines

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here