नाशिकः नाशिक महापालिकेतील शिवसेनेच्या नगरसेविका यांचे करोनामुळं निधन झाले आहे. कल्पना यांच्या निधनानं नाशिक शहरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

कल्पना पांडे यांना काही दिवसांपूर्वी करोनाची लागण झाली होती. त्यांच्यावर नाशिकमधील एका खासगी रुग्णलयात उपचार सुरु होते. मात्र, आज उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली आहे. कल्पना यांच्या निधनानं महापालिकेत मोठी खळबळ उडाली आहे. शिवसेनेच्या प्रभाग २४ मध्ये विद्यमान नगरसेविका म्हणून त्या काम पाहत होत्या. त्या नाशिक महापालिका निवडणुकीत चार वेळा निवडुन आल्या होत्या. त्यांना महापालिकेच्या कामकाजाचा दांडगा अनुभव होता. तसंच, प्रभागातील विकास कामे व मतदारांशी संपर्कही तगडा होता.

नाशिक महापालिकेत प्रवेशावर निर्बंध

महापालिका मुख्यालय अर्थात, राजीव गांधी भवनमध्ये करोना चाचणी निगेटिव्ह असलेल्यांनाच प्रवेश देण्याचे आदेश महापालिका आयुक्त कैलास जाधव यांनी दिले आहेत. नाशिक शहरात करोनाचा वाढता प्रादुर्भाव चिंतेचा विषय ठरला आहे. करोना नियंत्रणाची मुख्य जबाबदारी असलेल्या महापालिकेलाच आता करोना विळखा घालू लागला आहे. उपायुक्त (प्रशासन) मनोज घोडे-पाटील, उद्यान उपायुक्त शिवाजी आमले, शहर अभियंता संजय घुगे, कार्यकारी अभियंता शिवाजी चव्हाणके, वैद्यकीय अधीक्षक डॉ. बापूसाहेब नागरगोजे, डॉ. आवेश पलोड आदी प्रमुख अधिकारी, तसेच कर्मचाऱ्यांना करोनाची बाधा झाली आहे. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here