नांदेडः नांदेडच्या डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय महाविद्यालयातील करोनाबाघित रुग्णांना चक्क घरी पाठवले जात असून रुग्णालयातील ऑक्सिजनचा उपलब्ध साठा येत्या काही तासात संपणार असल्याची धक्कादायक माहिती रुग्णालय वैद्यकीय अधीक्षक डॉ.वाय एस. चव्हाण यांनी दिलीये तसंच, रुग्णालयातील खाटाही भरल्या असल्याची माहितीही त्यांनी दिली आहे

मंगळवारी ६ एप्रिल रोजी झालेल्या बैठकीत नांदेडचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी जम्बो कोविड सेंटरला मान्यता दिली होती, या कोविड सेंटरमध्ये एकाचवेळी २०० रुग्णांवर उपचार केले जातील असे नियोजन जिल्हा प्रशासनाकडून सुरू असताना अचानक ऑक्सिजनचा अपुरा पुरवठा आणि बेड शिल्लक नसल्यामुळे येथे दाखल झालेल्या रुग्णांची अक्षरशः हेळसांड होत आहे. ऑक्सिजन अभावी अनेक रुग्ण दगावत असल्याची धक्कादायक माहिती समोर येते आहे.

आपले संपूर्ण कुटुंब करोना पॉझिटिव्ह झाल्यावर बेडसाठी अक्षरशः वणवण भटकावे लागत आहे अशी माहिती समर्थनगर येथील श्रावणी मामीडवार या तरुणीने मटाच्या प्रतिनिधींशी बोलताना सांगितली. सामान्य लोकांना बेडसाठी खूप संघर्ष करावा लागतोय, अशा या परिस्थितीत किती वणवण भटकावे लागत आहे असे सांगत देशाचे पंतप्रधानमंत्री व राज्याचे मुख्यमंत्री यांना श्रावणीने मदतीसाठी हाक दिली आहे.

या परिस्थितीच्या संदर्भात जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नीलकंठ भोसीकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. तर, इतक्या लवकर रुग्णालयातील ऑक्सिजनचा साठा कसा काय संपतो यावर जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांनीही अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here