मुंबईः मुंबई महापालिकेचे माजी आयुक्त यांनी केंद्रात मोठी जबाबदारी मिळाली आहे. राष्ट्रीय क्षमता निर्माण आयोगाच्या सदस्यपदी त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्रीय मंत्रीमंडळानं योजनेस मंजुरी दिली होती. त्याअंतर्गंत या योजनेतील महत्त्वाचा घटक असलेल्या राष्ट्रीय निर्माण आयोगासाठी पंतप्रधानांनी तीनसदस्यीय समितीची स्थापना केली असून त्याच्या अध्यक्षपदी क्लॉलिटी कंट्रोल ऑफ इंडियाचे प्रमुख आदिल जैनुलभाई यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर, प्रशासन सदस्यपदी मुंबई महापालिकेचे माजी आयुक्त प्रविण परदेशी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

कर्मयोगी मिशन

नागरी सेवा अधिकाऱ्यांच्या कार्यशैलीत सुधारणा व्हावी यासाठी मंत्रिमंडळाने मिशम कर्मयोगी योजनेला मंजुरी दिली होती. यामागे सरकारच्या विविध कर्मचारी आणि अधिकाऱ्यांची कार्यक्षमता वाढवणे हा कर्मयोगी योजना आणण्याचा सरकारचा उद्देश असल्याचं बोललं जात आहे. तसंच, लोकांच्या अपेक्षाला पात्र ठरणारे अधिकारी तयार करणे हाच या योजनेचा उद्देश आहे, असं सरकारनं म्हटलं आहे.

कोण आहेत प्रवीण परदेशी

प्रवीण परदेशी हे १९८५च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. परदेशी यांनी मुख्यमंत्री कार्यालयाआधी वन, पर्यावरण, अर्थ, नगर विकास व महसूल अशा विविध विभागांत जबाबदारी यशस्वीपणे सांभाळलेली आहे. १९९३मध्ये लातूरमध्ये भूकंप झाला होता तेव्हा परदेशी लातूरचे जिल्हाधिकारी होते. तेव्हा त्यांनी जो कामाचा धडाका दाखवला होता त्याची मोठी प्रशंसा झाली होती. देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी लगेचच परदेशी यांना आपल्या कार्यालयात अतिरिक्त मुख्य सचिवपदी आणले होते. त्यानंतर प्रवीण परदेशी यांच्याकडे मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदाची जबाबदारी देण्यात आली होती. मात्र, गेल्या वर्षी करोनाकाळात मुंबई महापालिका आयुक्तपदावरून तडकाफडकी उचलबांगडी करण्यात आली होती.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here