सांगली: करोनावर आक्षेपार्ह वक्तव्य करणारे शिवप्रतिष्ठानचे अध्यक्ष यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि आणि राज्याचे जलसंपदा मंत्री यांनी जोरदार टोला लगावला आहे. राज्यावर आलेले दूर करण्यासाठी राज्यसरकार आणि जनता एकत्रितपणे प्रयत्न करत आहेत. असे असताना दिशाभूल करणारी वक्तव्ये करणे गैर आहे, असे जयंत पाटील यांनी म्हटले आहे. कोणी जर अशी वक्तव्ये करत असतील तर तपास करून आवश्यकता वाटल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असेही पाटील पुढे म्हणाले. एक प्रकारे पाटील यांनी भिडे यांना हा इशाराच दिला असल्याचे मानले जात आहे. (water resources minister jayat patil gave a warning to )

सांगलीत आयोजित पत्रकार परिषदेत पाटील बोलत होते. करोनाचे संकट असताना त्याबाबत गैरसमज पसरवणारी वक्तव्ये कोणी करत असेल तर ती खपवून घेतली जाणार नाहीत, असेही पाटील म्हणाले. सध्या राज्यात करोनाचा संसर्ग वाढत आहे. अशा परिस्थितीत अयोग्य वक्तव्ये करून समाजाची दिशाभूल करणे गैर असल्याचे ते म्हणाले.

क्लिक करा आणि वाचा-
करोनाच्या या संकटाला राज्य सरकार जनतेच्या साथीने परतवून लावण्याचा प्रयत्न करत असताना आंबे खाल्ल्यावर मुलं होतात, असा प्रवृत्तीच्या लोकांकडून जर गैरसमज पसरवणारी वक्तव्ये होत असतील तर ते गैर आहे. एरवी अशी वक्तव्ये खपत असतात. पण आताचा काळ पाहता अशी वक्तव्य केली गेल्यास आलेल्या संकटाचे गांभिर्य कमी होऊन जाते. कोणीही आला आणि काहीही बोलू लागला तर समाजा करत असलेल्या प्रयत्नांमध्ये अडथळे निर्माण होऊ शकतात. याचा विचार करता अशी वक्तव्ये कायद्याच्या दृष्टीने तपासून योग्य ती कारवाई करणे आवश्यक आहे, असे पाटील म्हणाले. संभाजी भिडे पुन्हा अशा प्रकारची वक्तव्ये करणार नाही, अशी आशाही त्यांनी व्यक्त केली.

क्लिक करा आणि वाचा-

हा रोग नाही. हा रोग … वृत्तीच्या लोकांना होणारा आजार आहे, असे वादग्रस्त वक्तव्य संभाजी भिडे यांनी केले होते. त्यांच्या या वक्तव्यानंतर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या.

क्लिक करा आणि वाचा-

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here