: गडचिरोलीतील खोब्रामेंढा येथील जंगलात २९ मार्च रोजी पोलिसांसोबतच्या चकमकीत पायाला गोळी लागून जखमी झालेल्या कमांडरला पोलिसांनी तात्काळ रुग्णालयात दाखल केले. त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. आता त्याची प्रकृती स्थिर आहे. किशोर कवडो असे या कमांडरचे नाव आहे.

खोब्रामेंढा-हेटळकसा जंगलात पोलीस दलाच्या सी-६० पथकाचे जवान नक्षलविरोधी अभियान राबवत असताना नक्षलवाद्यांशी झालेल्या चकमकीत जहाल नक्षली भास्कर हीचामी याच्यासह पाच नक्षली ठार झाले होते. त्यानंतर कटेझरी पोलीस मदत केंद्रातील पोलिसांनी शोध मोहीम राबविली असता, तीपागड येरीया प्लाटून क्रमांक १५ चा कमांडर किशोर उर्फ गोंगलु उर्फ सोबु धीसू कवडो (३८) हा जखमी अवस्थेत आढळून आला. किशोर कवडो यांच्या पायाला गोळी लागली होती. पोलिसांनी त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल केले. त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली असून, त्याची प्रकृती स्थिर असल्याचे पोलिसांनी सांगितले. चकमक, खून, जाळपोळ अशा अनेक गुन्ह्यांमध्ये त्याचा सहभाग आहे. त्यामुळे पोलीस विभाग त्याच्यावर पुढील कारवाई करणार आहे. किशोर कवडो हा एटापल्ली तालुक्यातील रामनटोला येथील मूळ रहिवासी आहे.

नक्षल समर्थक गणपत कोल्हेला अटक

जखमी किशोर कवडो व अन्य नक्षलवाद्यांना मदत केल्याच्या संशयावरून पोलिसांनी गणपत कोल्हे या युवकास अटक केली आहे. हा युवक कटेझरी परिसरातील रहिवासी आहे. घटनेचा तपास पोलीस करीत आहेत. दरम्यान नक्षल्यांनी आत्मसमर्पण करावे, असे आवाहन पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी केले.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here