मुंबई: राज्यात आज नव्या बाधित रुग्णांचा आकड्यात कालच्या तुलनेत पुन्हा वाढ झाली असून आजची रुग्णवाढही चिंतेत भर घालणारी आहे. गेल्या २४ तासांत राज्यात ६३ हजार २९४ नव्या रुग्णांचे निदान झाले आहे. काल ही संख्या ५५ हजार ४११ इतकी होती. कालच्या तुलनेत आज मोठी झाली असून ही वाढ ७ हजार ८८३ ने अधिक आहे. या बरोबरच, गेल्या २४ तासांमध्ये एकूण ३४ हजार ००८ करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले. काल ही संख्या ५३ हजार ००५ इतकी होती. याबरोबरच राज्यातील सक्रिय रुग्णांची संख्या ५ लाख ६५ हजार ५८७ वर जाऊन पोहचली आहे. ( see latest updates maharashtra registered 63294 new cases in a day with 34008 patients recovered and 349 deaths today)

आज राज्यात एकूण ३४९ करोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. काल ही संख्या ३२२ इतकी होती. सध्या राज्यातील मृत्यूदर १.७ टक्के इतका आहे. याबरोब राज्यात आज ३४ हजार ००८ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत, तर आतापर्यंत एकूण २७ लाख ८२ हजार १६१ रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८१.६५ टक्क्यांवर आले आहे.

पुण्यात सक्रिय रुग्णांची संख्या लाखांच्या पुढे

राज्यातील अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या ५ लाख ६५ हजार ५८७ इतकी झाली आहे. पुणे जिल्ह्यात सर्वाधिक १ लाख ०९ हजार ५९० इतके रुग्ण आहेत. मुंबई पालिका हद्दीत हा आकडा ९१ हजार १०० इतका आहे. ठाणे जिल्ह्यात सध्या ७४ हजार ३३५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर नागपूर जिल्ह्यात ही संख्या ५८ हजार ५०७ इतकी झाली आहे. नाशिकमध्ये सक्रिय रुग्णांची संख्या ३५ हजार १४७ इतकी आहे.

क्लिक करा आणि वाचा-
या बरोबरच अहमदनगरमध्ये १९ हजार ९३७ इतकी आहे. औरंगाबादमध्ये १७ हजार ०६९, तसेच नांदेडमध्ये ही संख्या ११ हजार ०९८ इतकी आहे. जळगावमध्ये १० हजार ५८९, तर रायगडमध्ये एकूण ८ हजार ६१४ इतके सक्रिय रुग्ण आहेत. अमरावतीत ही संख्या ३ हजार ५९५, तर, कोल्हापुरात सक्रिय रुग्णांची संख्या १ हजार ९१६ इतकी आहे. राज्यात सर्वात जास्त सक्रिय रुग्णांची संख्या पुण्यात आहे. तर, सर्वात कमी सक्रिय रुग्णांची संख्या गडचिरोली जिल्ह्यात आहे. येथे सक्रिय रुग्णांची संख्या १ हजार १७७ इतकी आहे.

क्लिक करा आणि वाचा-

३१,७५,५८५ व्यक्ती होम क्वारंटाइन

आतापर्यंत तपासण्यात आलेल्या २ कोटी २१ लाख १४ हजार ३७२ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ३४ लाख ०७ हजार २४५ (१५.४१ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ३१ लाख ७५ हजार ५८५ व्यक्ती होमक्वारंटाइनमध्ये आहेत. तर, २५ हजार ६९४ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.

क्लिक करा आणि वाचा-

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here