सोलापूरात सध्या इंजेक्शनचा तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांचे हाल होत आहेत. रेमडिसिवीर इंजेक्शन मिळविण्यासाठी गरीबांना रात्रं -दिवस पायपीट करावी लागत आहे. याची दखल घेत राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी सोलापूरसाठी ७५ रेमडिसिवीर इंजेक्शन पाठवून दिली आहेत. राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी वेल्फेअर फंडाच्या माध्यमातून हे इंजेक्शन्स देण्यात आली आहेत. शहरातील गरीब आणि गरजू नागरीकांना ही इंजेक्शन्स देण्यात येणार आहेत.
सध्या सोलापुरात रेमडीसीविर इंजेक्शन्सच्या वितरणावर देखरेखसाठी ठेवण्यासाठी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी समिती स्थापन केली आहे. त्या समितीकडे ही इंजेक्शन्स देण्यात येणार असल्याची माहिती महेश गादेकर यांनी दिली आहे.
क्लिक करा आणि वाचा-
यापूर्वीही गेल्या वर्षी शरद पवार यांनी सोलापूरकरांसाठी ८० रेमडिसिवीर इंजेक्शन पाठवून दिली होती. शरद पवार यांच्या पंचावन्न वर्षांच्या राजकीय कार्यकिर्दीचा शुभारंभ मंत्री म्हणून सोलापुरातून झाला. सोलापूरचे पालकमंत्रीपद भूषविलेल्या शरद पवार यांचे सोलापूरवर विषेश प्रेम आहे. सार्वजनिक जीवनांत सोलापूरातील प्रत्येक घडामोडीवर पवार यांचे बारीक लक्ष असते. दुष्काळ असो अथवा कोणतीही आपत्ती पवार नेहमी मसीहा बनून सोलापूरकरांच्या मदतीला येतात हे अनेकदा दिसून आले आहे. सोलापूरला मदत मिळवून देण्यासाठी पवार हे नेहमीच अग्रेसर राहिले आहेत.आताही कोरोना काळात पवार सोलापूरकरांच्या मदतीला धावून आल्याचे राष्ट्रवादीचे पदाधिकारी आवर्जून सांगत आहेत.
क्लिक करा आणि वाचा- क्लिक करा आणि वाचा-
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times