मुंबईः राज्यात करोना संसर्गाचा कहर वाढत असताना करोना प्रतिबंधासाठी वापरात येणारे रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा निर्माण झाला आहे. मात्र, आता राज्यात रेमडिसेवीरवरुन आरोप प्रत्यारोप सुरु झाले आहेत.

देशभरात रेमडेसिवीरचा तुटवडा असताना गुजरातमध्ये भाजपा कार्यालयात हे इंजेक्शन दिलं जात असून हे राजकारम नाही का? असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसेचे नेते यांनी केला होता. नवाब मलिक यांच्या आरोपांवर भाजप नेते यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. तसंच, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांच्यावरही निशाणा साधला आहे.

नवाब मलिक यांनी गुजरातमध्ये रेमडेसिवीर वाटल्याचा गदारोळ करत भाजपच्या कार्यकर्त्यांनी रेमडेसिवीर कुठून चोरुन आणले? असा प्रश्न विचारला होता. माझं नवाब मलिकांना आवाहन आहे की रोहित पवारांनी सोलापुरसाठी राष्ट्रवादीच्या पदधिकाऱ्यांना रेमडेसिवीर वाटल्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. त्यावरुन रोहित पवारांनी रेमडेसिवीर कुठून चोरुन आणलं हे विचारणार का? त्यांच्यामुळं आपला तो बाब्या आणि दुसऱ्यांचं ते कार्ट ही भूमिका मलिक यांनी थांबवावी, असा टोला प्रवीण दरेकर यांनी लगावला आहे. तसंच, नवाब मलिक निष्पक्ष असतील तर रोहित पवारांवर रेमडेसिवीर चोरुन आणल्याचा गुन्हा दाखल करणार का?; असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी सोलापूरसाठी ७५ रेमडिसिवीर इंजेक्शन पाठवून दिली आहेत. राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी वेल्फेअर फंडाच्या माध्यमातून हे इंजेक्शन्स देण्यात आली आहेत. सोलापूर शहरातील गरीब आणि गरजू नागरीकांना ही इंजेक्शन्स देण्यात येणार आहेत. सदरचे कीट आमदार रोहित पवार यांनी राष्ट्रवादी युवकचे प्रदेश सरचिटणीस प्रशांत बाबर आणि माजी नगरसेवक दीपक राजगे यांच्याकडे सुपूर्त केले.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here