मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पोलीस उपनिरीक्षक मोहन दगडे यांचा करोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांच्यावर बीकेसीतील कोव्हिड सेंटरमध्ये उपचार सुरु होते. तिथं उपचारादरम्यान त्यांची प्रकृती खालावली. त्यानंतर त्यांना पुढील उपचारासाठी आयसीयूमध्ये हलवण्यात आलं. मात्र, आज पहाटे त्यांचा मृत्यू झाला. त्याचं वय ५४ होतं. तर, आत्तापर्यंत १०१ पोलीस कर्मचाऱ्यांचा करोनामुळं मृत्यू झाला आहे.
दरम्यान, राज्यातील करोनाची स्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. सामान्य जनतेबरोबरच लोकप्रतिनिधींनाही करोनाची लागण होत असल्याचं समोर येत आहे. आज डहाणूचे भाजपचे माजी आमदार व भाजपचे माजी पालघर जिल्ह्याध्यक्ष पास्कल धनारे यांचं आज सकाळी निधन झालं आहे. गेल्या दहा दिवसांपासून धनारे यांच्यावर गुजरातमधील वापी येथील रेम्बो हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. तर, रविवारी नाशिक महानगरपालिकेच्या शिवसेनेच्या नगरसेविका कल्पना पांडे यांचे करोनामुळं निधन झालं होतं.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times