मुंबई: दिवसागणिक वाढत असलेल्या रुग्णसंख्येमुळं आरोग्य सुविधेवर मोठा ताण येत आहे. त्यातच काही खासगी रुग्णालयांमध्ये सौम्य लक्षणं असलेल्या रुग्णांनीही बेड अडवून ठेवले आहेत. यावर उपाय म्हणून मुंबई महापालिकेनं अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. रात्रीच्या वेळेत रुग्णांना तातडीनं बेड उपलब्ध करून देण्यासाठी मुंबई महापालिकेच्या प्रत्येक वॉर्डात नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती केली जाणार आहे.

वाचा:

मुंबई महापालिकेनं ही माहिती दिली आहे. रुग्णांमध्ये ऑक्सिजन लेव्हल कमी झाल्यास त्यांना तातडीनं उपचाराची गरज लागते. मात्र, अनेकदा बेड मिळत नाही. रात्रीच्या वेळेस बेड मिळवताना रुग्णांना प्रचंड त्रास होतो. लोकांना होणारा हा त्रास कमी व्हावा म्हणून नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात येणार आहे. त्यानुसार, मुंबई महापालिकेच्या २४ वॉर्डातील ‘वॉर रूम’ व जम्बो फिल्ड हॉस्पिटलसाठी हे नोडल अधिकारी काम करतील. विशेषत: रात्री ११ ते सकाळी ७ या वेळेत रुग्णांना लवकरात लवकर बेड कसा मिळेल हे पाहण्याची जबाबदारी या अधिकाऱ्यांवर असणार आहे. हे अधिकारी दुपारी ३ ते रात्री ११ आणि रात्री ११ ते सकाळी ७ अशा दोन शिफ्टमध्ये काम करतील. ‘हे नोडल अधिकारी सातत्यानं एकमेकांच्या संपर्कात राहून रुग्णांच्या बेडची व्यवस्था करतील,’ असं महापालिकेनं स्पष्ट केलं आहे.

वाचा:

मुंबईतील विविध रुग्णालयांमध्ये ३२५ अतिरिक्त आयसीयू बेडची व्यवस्था करण्यात आली असून एकूण आयसीयू बोडची संख्या २४६६ वर गेली आहे. मुंबईत येत्या दीड महिन्यात आणखी तीन ठिकाणी जम्बो कोविड सेंटर उभी राहणार असून याद्वारे दोन हजार बेड उपलब्ध होणार आहेत. यातील ७० टक्के बेड ऑक्सिजनचे असतील आणि २०० बेड आयसीयूचे असतील.

वाचा:

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here