प्रतिनिधी,

वडगाव कोल्हाटी येथून वीस लाखाच्या खंडणीसाठी एका संस्था चालकाच्या सहा वर्षीय केल्याची घटना सोमवारी (१२ एप्रिल) सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास घडली. पोलिसांनी अवघ्या तीन तासात रांजणगाव येथून अपहरणकर्ता संतोष रमेश सनान्से (२९, रा. रांजणगाव शेणपुंजी ता. गंगापूर मूळ रा. उंडणगाव ता. सिल्लोड) याला ताब्यात घेऊन शौर्य सोमशेखर हिरेमठ (६) याची सुटका केली आहे. ( for a and within three hours)

या प्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमशेखर रुद्रय्या हिरमेठ रा.वडगाव कोल्हाटी हे पत्नी पोर्णिमा व मुलगा शौर्य (६) यांच्यासह येथे राहतात. येथे हिरेमठ यांचे किराणा दुकान आहे तर त्यांच्या पत्नी पोर्णिमा हिरमेठ या आंबेलोहळ येथे त्यांची इंग्रजी शाळा आहे त्याचा कारभार पाहतात. सोमवारी सकाळी सोमशेखर हे दुकानात गेले होते तर पत्नी पोर्णिमा या शाळेत गेल्या गेल्या होत्या. त्यांचा मुलगा शौर्य घरात झोपलेला होता. सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास पौर्णिमा हिरेमठ याना त्यांचे पती सोमशेखर यांनी फोन करून शौर्य बेडरूम मध्ये नसल्याचे सांगितले. त्यानंतर काही वेळातच अपहरणकर्त्याचा फोन आला. आम्ही तुमच्या मुलाचे अपहरण केले असून त्याला सुखरूप मिळवायचे असेल तर वीस लाख रुपये घेऊन हायटेक कॉलेज जवळ या असे त्याने सांगितले.

त्यावेळी घाबरलेल्या पौर्णिमा हिरेमठ यांनी त्यांच्या पतीला याची माहिती दिली. त्यावेळी खंडणीखोराने पुन्हा फोन केला असता आमची खूप मोठी गँग आहे पोलिसांना कळवू नका? अन्यथा मुलाचे काम करून टाकू अशी धमकी दिली. त्यानंतर साडेदहा वाजेच्या सुमारास हिरेमठ यांनी अपहरणकर्त्याला फोन केला आम्ही पैसे घेऊन आलो आहोत तुम्ही कुठे आहेत? विचारले. त्यानंतर त्याने आमची माणस तुमच्या मागेच आहेत. त्यांना पैसे द्या त्यानंतर तुमच्या मुलाला प्रताप चौकात सोडून देईन असे सांगितले.

त्यावेळी पोलिसांनी आम्ही त्याचा शोध घेत आहोत, तुम्ही फोनवर बोलत राहा असे सांगितल्यावर अपहरणकर्त्याला पौर्णिमा यांनी पुन्हा फोन करून मला मुलाशी बोलायचे आहे असे सांगितले. तेव्हा त्यांनी मुलाशी बोलणे करून दिले. त्यावेळस मुलाला तू कुठे आहेस विचारले असता त्यांनी फोन बंद केला. तोपर्यंत पोलिसांनी फोनच्या लोकेशनवरून अपहरणकर्त्याला मुलासह ताब्यात घेतले होते. यावेळी अपहरण कर्त्याला बघितले असता तो काही दिवसापूर्वी हिरेमठ यांच्या कडे भाड्याने राहत होता. मात्र मागील दोन महिन्या पासून तो रांजणगाव येथे राहण्यासाठी गेला असल्याचे हिरेमठ यांनी सांगितले.

असे केले अपहरण

अपहरणकर्ता संतोष याने हिरमेठ यांच्या घरात सकाळी आठ वाज सुमारास प्रवेश करुन सहावर्षीय शौर्य याला चोर आले आहेत. तुझ्या आईने तुला माझ्या सोबत येण्यास सांगितले आहे असे सांगितले. संतोष हा हिरमेठ यांच्या घरी काही दिवस किरायाने राहिला असल्याने ओळखीचा होता तसेच त्याचे नेहमी घरी येणे जाणे असल्याने शौर्यने त्याच्यावर विश्वास ठेवला. त्यावेळी संतोषने शौर्य याला घराच्या पाठीमागच्या बाजूने बाहेर घेऊन आला तसेच दुचाकीवरून बसवून त्याला अज्ञातस्थळी घेऊन गेला.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here