कोलकाताः पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी ( ) आतापर्यंत ४ टप्प्यांचं मतदान झालं आहे. मतदानाच्या प्रत्येक टप्प्यानंतर राजकारण तापत चाललं आहे. आता निवडणूक आयोगाने ( ) मोठं पाउल उचलत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ( ) यांच्यावर २४ तासांची प्रचार बंदी घातली आहे. ममता बॅनर्जी यांनी प्रक्षोभक भाषण केल्याचं आयोगाने म्हटलं आहे.

ममता बॅनर्जी यांनी प्रक्षोभक भाषण केल्याचा आरोप आहे. हा आरोप बरोबर असल्याचं आयोगाने म्हटलं आहे. तसंच एका प्रचारसभेत ममता बॅनर्जी यांनी हिंदू-मुस्लिम अशा धार्मिकतेच्या आधारावर मतं मागितली होती. ममतांवरील प्रचाराची बंदी सोमवारी रात्री ८ वाजेपासून लागू करण्यात आली आहे. निवडणूक आयोगाने या प्रकरणी ममता बॅनर्जींना आधी नोटीस बजावून त्यांच्याकडून स्पष्टीकरण मागितले होते.

ममता बॅनर्जी धरणे आंदोलन करणार

निवडणूक आयोगाचा निर्णय हा पक्षपाती आहे. लोकशाहीसाठी हा काळा दिवस आहे, असं तृणमूल काँग्रेसचे खासदार डेरेक ओब्रायन म्हणाले. तर निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात ममता बॅनर्जी या धरणे आंदोलन करणार आहेत. निवडणूक आयोगाविरोधात आपण कोलकाता उद्या दुपारी १२ वाजेपासून गांधी पुतळ्याजवळ आपण धरणे आंदोलनाला बसणार आहोत, असं ममता बॅनर्जी म्हणाल्या आहेत.

ममता बॅनर्जी यांनी निवडणूक आचारसंहितेचे उल्लंघन केले आहे. कूचबिहारमधील प्रचारसभेत ममतांनी दिलेल्या भाषणामुळे त्यांच्यावर ही प्रचार बंदी घालण्यात आली आहे. सुरक्षा दलाच्या जवानांना तरुण आणि महिलांनी घेरावं. सुरक्षा दलांचे जवान हे एका विशिष्ट पक्षासाठी मतदानादरम्यान मदत करू शकतात. यामुळे नागरिकांनी त्यांना विरोध करावा, असं वक्तव्य ममतांनी केलं होतं.

कूचबिहारमध्ये चौथ्या टप्प्यातील मतदानावेळी सुरक्षा दलाच्या जवानांशी झालेल्या झटापटीवेळी चार जण ठार झाले होते. या घटनेला ममता बॅनर्जी यांचे प्रक्षोभक भाषण जबाबदार असल्याचा आरोप केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी केला होता.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here