सातारा: वडूज येथील ग्रामीण रूग्णालयातील कोविड सेंटर बंद असल्याने आज येथे कोरोना बाधित एका महिला रुग्णाला रुग्णालयाच्या बाहेरच रिक्षामध्ये ऑक्सीजन लावावा लागला. (as the covid center was closed, the in of )

याबाबत समजलेल्या माहितीनुसार, येथील ७५ वर्षीय एक वृद्ध महिला आज सकाळी अकरा ते बारा वाजण्याच्या सुमारास कोरोना तपासणीसाठी आली होती. तपासणीनंतर संबंधित महिला कोरोना बाधित असल्याचे आढळून आले. त्यावेळी तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी महिलेची ऑक्सीजन लेवलची तपासणी केली असता ती कमी होती. त्यातच ग्रामीण रूग्णालयातील कोव्हिड सेंटर बंद होते आजपासून ते कार्यान्वीत करण्यात येणार होते, मात्र त्यासाठी आवश्यक ते वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी आदी स्टाफ उपलब्ध न झाल्याने ते सेंटर सुरू होऊ शकले नाही.

शिवाय ग्रामीण रूग्णालयातील बाह्यरूग्ण विभाग सुरू असल्याने त्याठिकाणी रूग्ण होते. त्यामुळे संबंधित महिला रूग्णाला रूग्णालयाच्या बाहेरच एका रिक्षामध्ये ऑक्सिजन लावण्यात आला होता. त्यानंतर महिला रूग्णाच्या नातेवाईकांनी रूग्णवाहिकेसाठी संपर्क साधला. मात्र तीन ते चार तास रूग्णवाहिका उपलब्ध होऊ शकली नसल्याचे नातेवाईकांनी सांगितले. त्यानंतर नातेवाईकांनी कोरेगाव येथील खासगी रूग्णवाहिकेशी संपर्क साधून त्या रूग्णवाहिकेने रूग्णाला साताऱ्याला नेले. या घटनेची चर्चा आज शहरात सुरू होती. शहरात कोरोना बाधित रूग्णांची संख्या वाढत आहे. ग्रामीण रूग्णालयातील कोव्हीड सेंटर तातडीने सुरू करण्याची मागणी नागरिकांतून होत आहे.

क्लिक करा आणि वाचा-
प्रशासनाने लॉकडाऊनचे कडक निर्बंध करून कोरोनावर आळा घालण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. मात्र शहरात गेल्या काही दिवसांत कोरोना बाधित रूग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे प्रशासनाने तातडीने येथील कोव्हिड सेंटर सुरू करावे अन्यथा कोरोना बाधित रूग्णांना शासकीय कार्यालयांत आणून दाखल करू, असे संजय गांधी निराधार योजना समितीचे अध्यक्ष विजयकुमार शिंदे यांनी म्हटले आहे.

क्लिक करा आणि वाचा- क्लिक करा आणि वाचा-

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here