मुंबई: उद्योगपती यांच्या घराबाहेर आढळलेल्या स्फोटकांप्रकरणी राष्ट्रीय तपास संस्था ( एनआयए ) चौकशी करत असून या तपास पथकाचे नेतृत्व करत असलेले महानिरीक्षक यांची तडकाफडकी बदली करण्यात आल्याचे वृत्त आहे. अनिल शुक्ला यांची मिझोरामला बदली करून त्यांच्याजागी यांच्याकडे सूत्रे सोपवण्यात आली आहेत. दरम्यान, राज्याचे ग्रामविकास मंत्री व राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांनी या बदलीवरून केंद्र सरकारवर गंभीर आरोप केला आहे. ( )

वाचा:

अँटिलिया निवासस्थानाबाहेर स्कॉर्पिओ कारमध्ये आढळलेली स्फोटके आणि स्कॉर्पिओ मालक मनसुख हिरन हत्येप्रकरणी एनआयए मार्फत तपास सुरू आहे. याप्रकरणी एनआयएने मुंबई पोलीस दलातील सहायक पोलीस निरीक्षक म्हणून सेवेत राहिलेले व सध्या निलंबित असलेले यांना अटक केली आहे. याप्रकरणी तपासाला वेग आला असून वाझे यांचे सहकारी रियाज काझी यांनाही अटक करण्यात आली आहे. दुसरीकडे मुंबईचे माजी पोलीस आयुक्त यांचा जबाब नोंदवून घेण्यात आला आहे तर निवृत्त पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा यांच्यावरही एनआयए टीमकडून प्रश्नांची सरबत्ती करण्यात आली आहे. हा तपास सध्या अत्यंत महत्त्वाच्या वळणावर असतानाच अनिल शुक्ला यांच्या बदलीचे वृत्त येत असल्याने अनेक प्रश्न उपस्थित होवू लागले आहेत.

वाचा:

मिळालेल्या माहितीनुसार, अनिल शुक्ला यांची मिझोराममध्ये बदली करण्यात आली आहे. अनिल शुक्ला हे मिझोराम केडरचे १९९८च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. त्यांना महाराष्ट्रात प्रतिनियुक्तीवर पाठवण्यात आले होते. प्रतिनियुक्तीचा कार्यकाळ संपल्यानंतर नियमानुसारच त्यांची बदली करण्यात आली आहे, असेही सांगण्यात येत आहे. दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसने मात्र या बदलीवर संशय घेतला आहे.

वाचा:

राष्ट्रवादीकडून मंत्री हसन मुश्रीफ यांनी या बदलीवर बोट ठेवत थेट केंद्रावर गंभीर आरोप केला आहे. अंबानी यांच्या घराबाहेर जी स्फोटके ठेवली त्यात कुठेतरी परमबीर सिंग यांचाही सहभाग स्पष्ट होवू लागला होता. एनआयएच्या तपासाचे धागेदोरे त्यांच्यापर्यंत पोहचले होते. त्यातून अनिल शुक्ला यांनी परमबीर यांना या प्रकरणात मुख्य आरोपी केले असावे आणि ते केंद्राने मान्य केले नसावे. त्यातून शुक्ला यांची बदली केली असावी, अशी शक्यता हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केली आहे. इतकं गंभीर प्रकरण असूनही तपास सुरू असताना प्रमुख अधिकाऱ्याची बदली करण्याचे कारण काय, असा सवालही मुश्रीफ यांनी विचारला.

वाचा:

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here