घटनास्थळावरून आरोपीच्या गाडीतून २६५ किलो जप्त करण्यात आला असून इंडिका गाडीही जप्त करण्यात आली आहे. तेजराव अशोक लोणे असे आरोपीच नाव असून आणि हा आरोपी शेतकरी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा उप तालुका प्रमुख आहे.
क्लिक करा आणि वाचा-
सालई गोंदाची अवैधरित्या वाहतूक होणार असल्याची गुप्त माहिती वनाधिकाऱ्यांना मिळाली होती. त्यानुसार जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यातील भिंगारा ते निमखेडी रस्त्यावर वन विभागाचे दबा धरुन बसले. भिंगाराकडून जळगांवकडे येणाऱ्या रस्त्याने चॉकलेटी रंगाची टाटा इंडिगो कार येत असल्याचे वन अधिकाऱ्याना दिसली. कारला थांबविण्याचा प्रयत्न केला असता गाडीतील तस्कराने वनअधिकारी व वनकर्मचारी यांना पाहून गाडी तेथेच सोडली आणि तो जंगलातून पसार झाला. गाडीची तपासणी केली असता त्या गाडीतून वनोपज असलेला सालई गोंदाचे ८ कट्टे आढळून आले. ही कारवाई आज पहाटे ५ वाजता करण्यात आली आहे.
क्लिक करा आणि वाचा-
तेजराव अशोक लोणे हा घटनास्थळावरून गाडी व त्याचा मोबाईल हँडसेट सोडून फरार झाला आहे. वाहनाची तपासणी केली असता गाडीतून २६५ किलो सालई गोंद व गाडी आणि मोबाईल अशी मालमत्ता जप्त करून आरोपी विरुद्ध वनगुन्हा दाखल करण्यात आला आहे. फरार आरोपीचा शोध घेण्यासाठी वनविभागाचे कर्मचारी जामोद परिसरात शोध घेत आहेत. आरोपीविरुध्द विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
क्लिक करा आणि वाचा-
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times