वाचा:
सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर आलेले कृषीमंत्री दादा भुसे यांच्याकडे आमदार नाईक यांनी कोकणातील हापूसबाबत महत्त्वाच्या प्रश्नाकडे लक्ष वेधले. कोणत्याही प्रकारचा आंबा हा ‘कोकण हापूस’ म्हणून सगळीकडे विकला जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची व ग्राहकांचीही फसवणूक होत आहे, असे नाईक यांनी सांगितले. याबाबत लगेचच दादा भुसे यांनी सहकार मंत्री यांच्याशी संपर्क साधला. कोकणातील आंबा उत्पादक शेतकऱ्यांच्या उत्पन्नावर याचा परिणाम होत असून ग्राहकांची यात मोठ्या प्रमाणात फसवणूक होत आहे. ही बाब त्यांनी सहकार मंत्र्यांच्या कानावर घातली. त्यानंतर त्यांच्या सूचनेनुसार मुंबई कृषि उत्पन्न बाजार समितीच्या सचिवांनी दिनांक १२ एप्रिल रोजी परिपत्रक जारी केले आहे. त्यानुसार फळ बाजार आवारात मोठ्या प्रमाणावर आवक होत असलेला आंबा हा शेतमाल ज्या राज्यातून व ज्या नावाने येईल, त्याच नावाने त्याची विक्री होईल, याबाबतची दक्षता घेण्यात यावी. अशाप्रकारे फसवणूक करून परराज्यातून आलेला आंबा हा शेतमाल त्या राज्याच्या व आंब्याच्या जातीने विक्री होत नसल्याचे आढळून आल्यास किंवा याबाबतची तक्रार आल्यास संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, अशा स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत.
वाचा:
दरम्यान, दादा भुसे हे नुकतेच सिंधुदुर्ग जिल्ह्यात आले होते. या दौऱ्यात त्यांनी खारेपाटण पासून सावंतवाडी पर्यंत दौरा केला. त्यात बागायतदारांच्या बागेत जाऊन पिकांची त्यांनी पाहणी केली. काजूला हमीभाव मिळण्यासाठी समिती स्थापन करण्याचे त्यांनी आश्वासन दिले. कृषीमंत्र्यांच्या दौऱ्यात आमदार वैभव नाईक, सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत आणि युवा नेते संदेश पारकर सहभागी झाले होते.
वाचा:
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times