श्रीनगरः जम्मू-काश्मीरच्या मुख्यमंत्री आणि पिपल्स डेमोक्रॅटिक पक्षाच्या प्रमुख महबूबा मुफ्ती ( ) यांनी काश्मीर मुद्द्यावर केंद्र सरकारला सल्ला दिला आहे. काश्मीर मुद्द्यावर तोडगा काढण्यासाठी पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानमध्ये जाऊन चर्चा केली पाहिजे. दोन्ही देशांनी शस्त्र सोडून काश्मीरमध्ये शांतता कायम राखण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे, असं मुफ्ती म्हणाल्या.

केंद्र सरकारने काश्मीर मुद्द्यावर तातडीने कुठलंही पाऊल उचललं नाही तर परिस्थिती आणखी बिघडेल, असं मेहबूबा मुफ्तींनी सांगितलं. पक्ष विशेष सदस्य मोहीमला सुरुवात करताना त्या श्रीनगरमधील पक्षाच्या कार्यलायत बोलत होत्या.

३७० चा निर्णय मागे घेण्यावरून भाजपला राग का येतो?

काश्मीरमध्ये कलम ३७० पुन्हा लागू करण्याची मागणी केल्याने भाजपचा संताप का होतो? मग काय ही मागणी आम्ही पाकिस्तानकडे करावी का? स्वातंत्र्यानंतर जम्मू-काश्मीर हे भारतातला मिळाले नाही ना पाकिस्तानला, असं वक्तव्य मुफ्ती यांनी केलं.

भाजपकडे संख्याबळ आहे. पण विरोध करणाऱ्यांना चिरडून टाकणार असा त्याचा अर्थ होत नाही. जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा चीनने नव्हता दिला. यामुळे काश्मीरची जनता गप्प बसणार नाही. जम्मू-काश्मीर आणि लडाख नागरिकांमध्ये संताप आहे, असं मुफ्तीं बोलल्या.

केंद्र सरकार आपल्याविरोधात प्रकरणं शोधत आहे. जेणे करून आपल्याला त्रास देता येईल. यामुळे त्यांनी आपल्या आईला समन्स पाठवलं. पण आपण घाबरणार नाही. सरकारने हवं तर भावाला आणि मुलीला समन्स पाठवावं, असं म्हणाल्या.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here