मुंबई: राज्यात संसर्गाने थैमान घातले असताना व लॉकडाऊनचे सावट असताना आज पॉझिटिव्ह बातमी हाती आली आहे. गेल्या २४ तासांत नवीन बाधितांच्या तुलनेत बरे होणाऱ्या रुग्णांचा आकडा अधिक राहिला आहे. एकाच दिवशी तब्बल ५२ हजार ३१२ रुग्ण करोनावर मात करून घरी परतले आहेत. हा दुसरा उच्चांकी आकडा ठरला आहे. दोनच दिवसांपूर्वी २४ तासांत तब्बल ५३ हजार रुग्णांनी करोनावर मात करण्यात यश मिळवले होते. ( )

वाचा:

राज्यात गेल्या काही दिवसांपासून करोनाचा उद्रेक पाहायला मिळत आहे. सातत्याने रुग्णसंख्येचा उच्चांक नोंदवला जात आहे. रविवारी तर ६३ हजार २९४ इतकी आतापर्यंतची सर्वोच्च रुग्णसंख्या नोंदवली गेली होती. त्यानंतर नवीन बाधितांच्या संख्येत आज घट झाली आहे तर करोनामुक्त रुग्णांचा आकडा वाढला आहे. आज दिवसभरात ५१ हजार ७५१ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे तर ५२ हजार ३१२ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. नवीन बाधितांच्या तुलनेत करोनामुक्तांचा आकडा आज अधिक राहिल्याने हे काहिसा दिलासा देणारे चित्र आहे.

वाचा:

राज्यातील करोनाची आजची आकडेवारी आरोग्य विभागाने जारी केली आहे. त्यानुसार राज्यात आज २५८ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर १.६८% एवढा आहे. आज ५२ हजार ३१२ रुग्ण बरे झाल्याने आजपर्यंत करोनावर मात करणाऱ्या एकूण रुग्णांची संख्या २८ लाख ३४ हजार ४७३ इतकी झाली आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता (Recovery Rate) ८१.९४ टक्के एवढे झाले आहे. राज्यात आजपर्यंत तपासण्यात आलेल्या २ कोटी २३ लाख २२ हजार ३९३ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ३४ लाख ५८ हजार ९९६ (१५.४९ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ३२,७५,२२४ व्यक्ती होम क्वारंटाइनमध्ये आहेत तर २९,३९९ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.

वाचा:

राज्यातील अॅक्टिव्ह रुग्णांचा आकडा सहा लाखांच्या दिशेने सरकला आहे. आजच्या नोंदीनुसार सध्या एकूण ५ लाख ६४ हजार ७४६ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. त्यात जिल्ह्यातील स्थिती चिंता वाढवणारी असून तिथे अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या १ लाख १० हजार इतकी झाली आहे. पुण्यानंतर पालिका क्षेत्रात सध्या ८९ हजार १२५ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत तर जिल्ह्यात हा आकडा ७६ हजार ६८३ इतका झाला आहे. जिल्ह्यात ५९ हजार ७५६, नाशिक जिल्ह्यात ३७ हजार ७६० तर औरंगाबाद जिल्ह्यात सध्या १५ हजार ५४२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. मुंबईत आज नवीन ६ हजार ८९३ तर पुणे पालिका क्षेत्रात आज ५ हजार ३४ नवीन रुग्णांची नोंद झाली.

वाचा:

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here