म. टा. प्रतिनिधी,

‘मी मास्क वापरतो तुम्ही मास्क वापरा’ असे आवाहन करत करोनाच्या पार्श्वभूमीवर गृहराज्यमंत्री आणि कोल्हापूरचे पालकमंत्री यांनी आपल्या काळातील वाढदिवसाचा विधायक पॅटर्न तयार केला. तब्बल ५० लाख लोकांपर्यंत हा मेसेज पाठवत त्यांनी करोनाला रोखण्यासाठी नवे विधायक पाऊल उचलले. त्यांनी केलेल्या आवाहनाला राज्यभरातील नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी व्हिडीओतून तसेच सोशल मीडियाद्वारे मास्कसह त्यांना शुभेच्छा देत प्रतिसाद दिला.

वाचा:

गृहराज्यमंत्री सतेज पाटील हे दरवर्षी १२ एप्रिल या त्यांच्या वाढदिवसानिमित्त वह्यांच्या स्वरुपात शुभेच्छा स्वीकारतात. गेल्या १३ वर्षांत ६५ लाखांहून अधिक वह्यांचे जिल्हा परिषद आणि महानगरपालिकेच्या शाळांमधील १४ लाख विद्यार्थ्यांना वाटप केले आहे. पण करोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाच्या वाढदिवसाला सामाजिक जाणीवेची जोड दिली. लोकांच्या सुरक्षीततेचा विचार करून मंत्री पाटील यांनी प्रत्यक्ष शुभेच्छा स्वीकारल्या नाहीत. त्याऐवजी “मी मास्क वापरतोय, तुम्हीही वापरा” याच माझ्यासाठी शुभेच्छा, असे आवाहन केले. या आवाहनाला राज्यातील विविध पक्षातील मातब्बर नेत्यांबरोबरच कार्यकर्त्यांनी सुद्धा उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

वाचा:

या सर्वांनी मास्क घातलेले व्हिडीओ आणि त्यासोबत संदेश सोशल मीडियावर पोस्ट केले. उपमुख्यमंत्री अजित पवार, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, राज्याच्या मंत्रीमंडळातील मंत्री बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण, जयंत पाटील, हसन मुश्रीफ, दिलीप वळसे-पाटील, अनिल परब, जितेंद्र आव्हाड, डॉ. नितीन राऊत, एकनाथ शिंदे, विजय वडेट्टीवार, सुभाष देसाई, वर्षा गायकवाड या मंत्र्यांसह खासदार सुप्रिया सुळे, राजीव सातव, संजय राऊत यांच्यासह आमदार आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या.

मंत्री पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सर्वसामान्य लोकांना एक लाख मास्क वाटप केले . युवक काँग्रेस आणि एनएसयूआय चे कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांनी कोल्हापूरातील भाजी विक्रेते, फळ विक्रेते तसेच रस्त्यावरील कष्टकरी यांना मास्कचे वाटप केले. या माध्यमातून मास्क वापरण्याबाबतचे प्रबोधन करण्यात आले.

वाचा:

करोना काळातील रक्ताचा तुटवडा लक्षात घेता मंत्री पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. शहरासह ग्रामीण भागातील विविध ठिकाणी झालेल्या रक्तदान शिबीरात ५०० हून अधिक रक्तदात्यांनी रक्तदान केले. पुढे आठवडाभर ही मोहीम सुरूच राहणार आहे. वाढदिवसानिमित्त कार्यकर्त्यांनी रुग्णालयात फळे वाटप सुध्दा केले. पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त कार्यकर्त्यांनी शुभेच्छा म्हणून आमदार ऋतुराज पाटील यांच्याकडे वह्या सुपूर्द केल्या.

वाचा:

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here