वाचा-
वानखेडे मैदानावर झालेल्या सामन्यात संजू सॅमसनने कर्णधारपदाला साजेशीर अशी फलंदाजी केली. कर्धार म्हणून संजूचा हा पहिलाच सामना होता. त्याने ६३ चेंडूत ११९ धावा केल्या. पण त्याचे हे शतक व्यर्थ गेले. अखेरच्या चेंडूवर ५ धावांची गरज असताना तो बाद झाला.
संजूने फक्त ५४ चेंडूत शतक केले. आयपीएलच्या इतिहासात कर्णधार म्हणून पहिल्या सामन्यात शतक करणारा तो पहिला खेळाडू ठरला. आयपीएलमधील संजूचे हे तिसरे शतक ठरले. भारताकडून आयपीएलमध्ये सर्वाधिक शतक करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत विराट कोहलीनंतर संजूचा क्रमांक लागतो. विराटने पाच शतक केली आहेत.
वाचा-
कर्णधार म्हणून एका डावात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम संजूच्या नावावर आहे. याआधी पदार्पणात कर्णधार म्हणून सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम श्रेयस अय्यरच्या नावावर होता. त्याने २०१८ मध्ये ९३ धावा केल्या होत्या.
पंजाबने केएल राहुलच्या ९१ आणि दीपक हु्डडाच्या ६४ धावांच्या जोरावर २२१ धावा केल्या होत्या. राजस्थानने विजयाचे लक्ष्य जवळजवळ गाठले होते. पण अखेरच्या चेंडूवर पाच धावांची गरज असताना संजूने मारलेला शॉट सीमे रेषेवर कॅच पकडला.
वाचा-
माझ्याकडे शब्द नाही. आम्ही फार जवळ पोहोचलो होतो. इतक्या जवळ पोहोचलो पण त्याला पार करू शकलो नाही. मला वाटते की मी शॉट चांगला मारला होता. टायमिंग देखील चांगली होती. पण कॅच पकडला. हा एक खेळाचा भाग आहे, असे संजू म्हणाला.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times