नवी दिल्ली : करोनाविरुद्ध लढण्यासाठी रशियानंतर आता अमेरिका, जपान आणि युरोपमधूनही लस आयात केली जाणार आहे. केंद्र सरकारकडून परदेशात विकसीत करण्यात आलेल्या लसींना आयात केलं जाणार आहे.

”, ” या ” लसीनंतर ” या पहिल्या परदेशी लसीला भारतात सोमवारी मंजुरी देण्यात आली होती. त्यानंतर आता इतर परदेशी लसींचीही भारतात आयात केली जाणार आहे.

भारतात सुरू असलेल्या सर्वात मोठ्या लसीकरण मोहिमेतील अडथळे दूर करण्यासाठी आणि लसीकरण मोहिमेचा वेग वाढवण्यासाठी परदेशांमध्ये विकसीत करण्यात आलेल्या आणि वेगवेगळ्या देशांत आपात्कालीन मंजुरी मिळवलेल्या करोना लसींची आयात केली जाणार आहे.

NAGVAC च्या प्रस्तावाला केंद्र सरकारची परवानगी

‘नॅशनल एक्सपर्ट ग्रुप ऑन व्हॅक्सीन अॅडमिनिस्ट्रेशन फॉर कोविड १९’ (NAGVAC) या तज्ज्ञांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.

USFDA (U.S. Food and Drug Administration), EMA (European Medicines Agency), UK MHRA (Medicines and Healthcare products Regulatory Agency), PMDA JAPAN (Pharmaceuticals and Medical Devices Agency) याशिवाय WHO (World Health Organization) च्या यादीत सहभागी झालेल्या आणि इतर देशांत आपात्कालीन मंजुरी मिळालेल्या लसींना भारतातही आपात्कालीन मंजुरी देण्यात येणार आहे. तज्ज्ञांच्या समितीचा हा प्रस्ताव भारत सरकारकडूनही मान्य करण्यात आला आहे.

अगोदर १०० जणांवर होणार वापर

परदेशातून आयात केल्या जाणाऱ्या लसीचा वापर अगोदर केवळ १०० लोकांवर केला जाईल तसंच पुढचे ७ दिवस त्यांच्यावर तज्ज्ञांचं लक्ष राहील. त्यानंतर या लसींचा वापर लसीकरण मोहिमेत केला जाईल.

करोनाबाधित रुग्णांची आकडेवारी

भारतात गेल्या २४ तासांत १ लाख ६१ हजार ७३६ करोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. सोमवारी ९७ हजार १६८ रुग्णांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली तर याच २४ तासांत ८७९ मृत्यूंची नोंद करण्यात आलीय. याचसोबत देशातील एकूण करोनाबाधित रुग्णांची संख्या १ कोटी ३६ लाख ८९ हजार ४५३ वर पोहचलीय. तर आतापर्यंत देशात एकूण १ लाख ७१ हजार ०५८ नागरिकांनी करोनामुळे आपले प्राण गमावले आहेत. सध्या देशात १२ लाख ६४ हजार ६९८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here