म. टा. प्रतिनिधी, : इन्स्टाग्रामवर तरुणीच्या नावाने बनावट अकाउंट सुरू करून, त्यावर तिचा मोबाइल क्रमांक आणि अश्लील मजकूर पोस्ट केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी ठाण्यात आयटी अक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत धनकवडी परिसरात राहणाऱ्या २५ वर्षीय तरुणीने तक्रार दिली आहे. त्यानुसार सहकारनगर पोलिसांनी अज्ञात व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार तरुणीच्या नावाने अज्ञात व्यक्तीने इस्टाग्रामवर बनावट अकाउंट उघडले. त्या ठिकाणी अश्लील मजकूर टाकून तरुणीचा मोबाइल क्रमांक देखील शेअर केला होता. त्यानंतर तरूणीला अनोळखी क्रमांकावरून फोन येऊ लागले. तसेच, तिच्याशी अश्लील भाषेत बोलू लागल्यामुळे तरूणी घाबरली.

याबाबत तिने चौकशी केल्यानंतर तिला इन्स्टाग्रामवर बनावट अकाउंट उघडल्याची माहिती मिळाली. त्यानंतर तिने तत्काळ पोलिसांकडे धाव घेऊन तक्रार दिली. या प्रकरणी आरोपीचा शोध घेतला जात आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक गोविंद गंभीरे हे अधिक तपास करत आहेत.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here