म. टा. प्रतिनिधी,

उद्या १४ एप्रिल, अर्थात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जयंतीदिन. राज्यभरात करोनाचा हाहाकार सुरू असून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साधेपणाने साजरी करण्याचे आवाहन राज्य शासनाने केले आहे. हे लक्षात घेत आजच्या करोना संसर्गजन्य परिस्थितीत औरंगाबादमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साधेपणाने साजरी करण्यात येणार आहे. ‘लव औरंगाबाद’च्या धर्तीवर ‘थँक यू डॉ. आंबेडकर’ असा फलक लावून तरुणाईने लक्ष वेधले आहे. या अभिनव संकल्पनेद्वारे आंबेडकरांना मानवंदना देण्यात आली आहे. (dr babasaheb ambedkar jayanti young people in say )

करोनाच्या पार्श्वभूमीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती लोकोपयोगी उपक्रम राबवून साजरी करण्यात येत आहे. सामाजिक जबाबदारीचे भान बाळगून यंदा जयंती साधेपणाने साजरी करण्यासाठी तरुण अनुयायी एकवटले आहेत. भडकल गेट परिसरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ अभिनव संकल्पनेतून आकर्षक फलक साकारण्यात आला आहे. शहराच्या सौंदर्यात भर घालण्यासाठी महानगरपालिकेने काही दिवसांपूर्वी ठिकठिकाणी लावलेले ‘लव औरंगाबाद’चे फलक चर्चेत आहेत. या धर्तीवर भडकल गेट चौकात ‘थँक यू डॉ. आंबेडकर’ असा डिजिटल फलक लावण्यात आला आहे. आंबेडकर जयंतीच्या पूर्वसंध्येला लावण्यात आलेल्या फलकाकडे सर्वांचे लक्ष वेधले गेले आहे.

क्लिक करा आणि वाचा-
अमोल भालेराव, अमोल साळवे या तरुणांनी स्वखर्चातून डिस्प्ले तयार करून आंबेडकरी अनुयायांना भेट दिली आहे. या उपक्रमासाठी विजय साळवे, सचिन निकम, गुणरत्न सोनवणे,विशाल बोर्डे,अनमोल लिहिणार,अमोल कतले, विशाल बनकर यांनी सहकार्य केले. करोनाचे थैमान कायम असून यावर्षी उत्सवावर भीतीचे सावट आहे. या परिस्थितीत हा वैविध्यपूर्ण प्रयोग चर्चेत आहे.

क्लिक करा आणि वाचा-
महानगरपालिकेने शहराच्या सौंदर्यात भर घालत ‘लव औरंगाबाद’चे डिस्प्ले बोर्ड लावले आहेत. आता ‘थँक यू डॉ. आंबेडकर’ या बोर्डने चौकाचा चेहरामोहरा बदलला आहे. या डिस्प्लेचे अनावरण लहान मुलाच्या हाताने करण्यात आले.

क्लिक करा आणि वाचा-

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here