तिसऱ्या सामन्यात न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारतीय डावाची सुरूवात पृथ्वी शॉ आणि मयांक अग्रवाल यांनी केली. मात्र मयांक पुन्हा एकदा अपयशी ठरला. तो एक धाव करून बाद झाला. त्यानंतर कर्णधार विराट कोहली देखील ९ धावांवर बाद झाला. दोन गडी बाद झाल्यानंतर पृथ्वी आणि श्रेयस अय्यर ही जोडी मैदानात होती. पृथ्वीने त्याच्या स्टाईलने आक्रमक खेळ सुरू केला. पण ४० धावांवर तो रनआऊट झाला. पृथ्वी बाद झाला तेव्हा भारताची अवस्था ३ बाद ६२ अशी होती.
वाचा-
त्यानंतर अय्यर आणि केएल राहुल या जोडीने भारताचा डाव सावरला. या दोघांनी धावसंख्या वाढवली आणि संघाला सुस्थितीत नेले. या जोडीने चौथ्या विकेटसाठी १०० धावांची भागिदारी केली. अय्यर ६२ धावांवर बाद झाला.
अय्यर बाद झाल्यानंतर राहुलने वनडेमधील पाचवे शतक पूर्ण केले. शतकी खेळीनंतर तो ११२ धावांवर बाद झाला. त्याने ११३ चेंडूत ९ चौकार आणि २ षटकारांसह ११२ धावा केल्या. ५० षटकात भारताने न्यूझीलंडला २९७ धावांचे आव्हान दिले आहे.
वाचा-
न्यूझीलंडकडून हमिश बेनेटने सर्वाधिक ४ विकेट घेतल्या. तीन सामन्यांच्या मालिकेत न्यूझीलंडने २-० अशी विजयी आघाडी घेतली असून भारतासाठी हा सामना प्रतिष्ठेचा आहे.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times