Live अपडेट्स…
>> मुख्यमंत्र्यांनी लॉकडाउन घोषित केल्यास तो किती दिवसांचा असेल?, तो दोन आठवड्यांचा असेल का?… याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
>> मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आजच लॉकडाउनची घोषणा करतील अशी माहिती पालकमंत्री शेख यांनी दिली होती. राज्यात संपूर्ण लॉकडाउन करण्यााबाबतची संपूर्ण तयारी राज्य सरकारने केली असल्याचेही ते म्हणाले होते.
>> मुख्यमंत्र्यांनी आयोजित केलेल्या टास्कफोर्सच्या बैठकीत राज्यात लॉकडाउन लागू करण्याती आवश्यकता असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.
>> महाविकास आघाडी सरकारवर अनेक मंत्र्यांनी लॉकडाउन घोषित होण्याची शक्यता वर्तवली असून आज मुख्यमंत्री ठाकरे नेमके काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे.
>> मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज रात्री साडे आठ वाजता सोशल मीडियाच्या माध्यमातून राज्यातील जनतेशी संवाद साधणार आहेत. मुख्यमंत्री सचिवालयाच्या जनसंपर्क कक्षाने ही माहिती दिली आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times