मुंबई: राज्यात कोरोनाचा उद्रेक झाला असून वाढत्या करोनासंसर्गावर नियंत्रण ठेवण्यासाठी यांनी राज्यात उद्या रात्री ८ वाजल्यापासून लागू करण्यात येत असल्याची घोषणा केली. येत्या १५ दिवस लागू करण्यात आली असून आधी विकेंड लॉकडाउनमध्ये लागू करण्यात आलेले निर्बंध अधिक कडक करण्यात आले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ही घोषणा आज फेसबुक लाईव्हद्वारे केली आहे.

बससेवा, लोकलसेवा, टॅक्सी, रिक्षा सुरू राहणार, पण…

महत्वाचे म्हणजे राज्यात अत्यावश्यक सेवा सुरू राहणार असून, ट्रेन आणि बस, टॅक्सी आणि ऑटोरिक्षा सुरू ठेवण्यात आल्या आहेत. मात्र, त्यांचा वापर अत्यावश्यक सेवा देणारे किंवा अत्यावश्यक महत्वाचे काम असलेले लोक वापर करू शकणार आहेत. ( imposes strict restrictions in the state from tomorrow see what will remain open and what will be closed)

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ब्रेक द चैनअंतर्गत हे अधिक कडक नियम घोषित केले असून त्याचे पालन केल्यानेच आपण करोनावर नियंत्रण मिळवू शकू आणि ही लढाई आता सुरू झाली असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.

क्लिक करा आणि वाचा-

राज्यात १४४ कलम आणि नाइट कर्फ्यू

राज्यात उद्या १४ एप्रिल रोजी १४४ कलम लागू करण्यात आले आहे. याचाच अर्थ राज्यात उद्यापासून पुढील १५ दिवस संचारबंदी असणार आहे.

कोणीही अत्यावश्यक गरज असेल तरच बाहेर पडू शकणार आहे.

अत्यावश्यक सेवेत मोडणाऱ्या सर्व गोष्टी वगळता इतर सर्व कंपन्या, आस्थापना, सार्वजनिक ठिकाणे, कार्यक्रम, सेवा बंद राहणार

क्लिक करा आणि वाचा-

सुरू राहणाऱ्या अत्यावश्यक सेवेच खालील गोष्टींचा समावेश

> रुग्णालये, वैद्यकीय तपासणी केंद्रे, क्लिनिक, लसीकरण, मेडिकल इंश्यूरन्स कार्यालये, औषधांची दुकाने, औषधांच्या कंपन्या, इतर वैद्यकीय सेवा आणि सुविधा सुरु राहणार आहेत. यात इतर वैद्यकीत उत्पादने त्यांचे वितरण, डिलर्स सेवा, वाहतूक आणि पुरवठा, लस उत्पादन आणि पुरवठा, सॅनिटायझर्स, मास्क, वैद्यकीय उपकरणे, त्यांचे इतर भाग, कच्चामाल आणि संबंधित सेवा सुरू राहणार आहेत.

> पशुवैद्यकीय सेवा, प्राणी निवारास्थान आणि प्राण्याच्या खाद्यांची दुकाने सुरू राहणार आहेत.

> धान्याची दुकाने, भाजीपाला, फळविक्रेते, दूध, बेकरी, मिठाई आणि सर्व प्रकारचे खाद्यपदार्थांची दुकाने सुरू राहणार आहेत.

> कोल्ड स्टोरेज आणि वेअरहाऊस सेवा सुरू राहणार

> विविध देशांच्या राजनितीज्ञांची कार्यालये सुरू राहतील

> स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अखत्यारित येणारी पावसाळ्यापूर्वीची सर्व कामे सुरू राहतील.

> स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सर्व सार्वजनिक सेवा सुरू राहणार

> भारतीय रिझर्व्ह बँक आणि बँकेशी संबंधित इतर सेवा सुरू राहतील.

> शेअर बाजार, सेबीकडे नोंदणीकृत असलेले डिपॉझिटरीज, क्लिअरिंग कॉर्पोरेशन्स सुरू राहणार

> शेती आणि शेतीशी संबंधित सेवा, तसेच शेतीला लागणारे खत, बियाणे, अवजारे त्यांची दुरुस्ती सेवा सुरू राहणार.

> आयात निर्यात सुरू राहणार.

> मान्यताप्राप्त प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी

> पेट्रोलपंप आणि पेट्रोलियम संबंधित उत्पादने सुरू राहणार.

> सर्व प्रकारच्या कार्गो सेवा सुरू राहणार.

> डेटा सेंटर्स, क्लाउड सेवा, आयटी सेवा सुरू राहणार.

> सरकारी आणि खासगी सुरक्षा सेवा सुरू राहणार.

> इलेक्ट्रिक आणि गॅस पुरवठा सुरू राहणार.

> एटीएम सुरू राहणार

> पोस्टसेवा सुरू राहणार

> कस्टम हाऊस एजंट, लस वाहतूकदार, औषधांची वाहतूक आणि इतर औषधी उत्पादनांची वाहतूक सुरू राहणार.

> कच्चा माल, पावसाळ्यासाठी लागणारे पॅकेजिंक मटेरियल उपलब्ध होणार.

क्लिक करा आणि वाचा-

सार्वजनिक वाहतूक व्यवस्था

सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुरू राहणार असून त्यांवर काही निर्बंध घातले गेले आहेत

> ऑटोरिक्षात केवळ चालक आणि इतर दोघांना बसण्याची परवानगी

> टॅक्सीत केवळ चालक आणि ५० टक्के प्रवाशांना प्रवासाची मुभा

> बसमध्ये केवळ बसून प्रवास, उभ्याने प्रवास करण्यास बंदी

> खासगी वाहतूक केवळ आणीबाणीच्या काळात सेवा देऊ शकतात

काय बंद असेल?

> रेस्टॉरंट्स, बार आणि हॉटेल्स सेवा बंद असतील, त्यांना केवळ घरपोच पार्सल सेवा देण्याची मुभा देण्यात आली आहे. ही सेवा सकाळी ७ ते संध्याकाळी ८ या वेळेत द्यावी लागणार आहे.

> रस्त्यालगत असणाऱ्या सर्व खाद्यपदार्थांची दुकाने बंद राहतील.

> वर्तमानपत्रे आणि मॅगझिन फक्त घरपोच सेवा सुरू राहील.

> चित्रपटगृहे, नाट्यगृहे, दुकाने, मॉल, शॉपिंग सेंटर्स बंद राहतील.

> सर्व धार्मिक स्थळे, प्रार्थनास्थळे बंद राहतील.

> केशकर्तनालये, स्पा, सलोन, ब्युटी पार्लर्स बंद राहतील

> शाळा आणि महाविद्यालये बंद राहतील.

> धार्मिक, सामाजिक, राजकीय आणि सांस्कृतिक कार्यक्रम बंद राहतील.

> जिथे कामगार राहत असतील केवळ अशाच ठिकाणची बांधकामे सुरू राहतील

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here