आज राज्यात एकूण २८१ करोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. काल ही संख्या २५८ इतकी होती. सध्या राज्यातील मृत्यूदर १.६६ टक्के इतका आहे. याबरोब राज्यात आज ३१ हजार ६२४ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत, तर आतापर्यंत एकूण २८ लाख ६६ हजार ०९७ रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८१.४४ टक्क्यांवर आले आहे.
पुण्यात सक्रिय रुग्णांची संख्या लाखांच्या पुढे
राज्यातील अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या ५ लाख ९३ हजार ०४२ इतकी झाली आहे. पुणे जिल्ह्यात सर्वाधिक १ लाख १८ हजार १६८ इतके रुग्ण आहेत. मुंबई पालिका हद्दीत हा आकडा ८६ हजार ०९८ इतका आहे. ठाणे जिल्ह्यात सध्या ८१ हजार ३०३ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर नागपूर जिल्ह्यात ही संख्या ६२ हजार ५२७ इतकी झाली आहे. नाशिकमध्ये सक्रिय रुग्णांची संख्या ४१ हजार ४३८ इतकी आहे.
क्लिक करा आणि वाचा-
या बरोबरच अहमदनगरमध्ये १५ हजार ६४२ इतकी आहे. औरंगाबादमध्ये १४ हजार ३४७, तसेच नांदेडमध्ये ही संख्या १२ हजार ४१९ इतकी आहे. जळगावमध्ये ११ हजार ३४२, तर रायगडमध्ये एकूण ९ हजार १२३ इतके सक्रिय रुग्ण आहेत. अमरावतीत ही संख्या ३ हजार ६००, तर, कोल्हापुरात सक्रिय रुग्णांची संख्या २ हजार ३०९ इतकी आहे. राज्यात सर्वात जास्त सक्रिय रुग्णांची संख्या पुण्यात आहे. तर, सर्वात कमी सक्रिय रुग्णांची संख्या गडचिरोली जिल्ह्यात आहे. येथे सक्रिय रुग्णांची संख्या १ हजार ४७९ इतकी आहे.
क्लिक करा आणि वाचा-
३२,९४,३९८ व्यक्ती होम क्वारंटाइन
आतापर्यंत तपासण्यात आलेल्या २ कोटी २५ लाख ६० हजार ०५१ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ३५ लाख १९ हजार २०८ (१५.६ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ३२ लाख ९४ हजार ३९८ व्यक्ती होमक्वारंटाइनमध्ये आहेत. तर, ३० हजार ३९९ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.
क्लिक करा आणि वाचा-
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times