वाचा:
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधताना राज्यातील स्थितीवर प्रकाश टाकला व निर्बंध कसे आवश्यक आहेत हे सांगितले. उद्या बुधवार १४ एप्रिल रोजी रात्री ८ वाजेपासून राज्यात आणखी कडक निर्बंध लावण्याची घोषणा त्यांनी केली व १ मे पर्यंत राज्यात असेल, असेही जाहीर केले. केवळ आवश्यक सेवा सुविधाच सुरू राहतील. सर्व प्रकारची वाहतूकही सुरूच राहणार आहे तसेच आर्थिक दुर्बल घटकांना देखील त्यांना त्रास होणार नाही यासाठी चांगले आर्थिक सहाय्य देण्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे.
वाचा:
विमानांद्वारे वाहतूक व्हावी
मुख्यमंत्री ठाकरे यावेळी विशेषत: ऑक्सिजन उपलब्धतेवर बोलले. ते म्हणाले की, राज्याला ऑक्सिजनची खूप गरज असून त्याचा पुरवठा व्हावा. सध्या १२०० मेट्रिक टन उत्पादन सुरु आहे आणि आपण कोविड आणि नॉन कोविड अशा सर्वांसाठी मिळून जवळजवळ तितकाच ऑक्सिजन वापरत आहोत. सर्व ऑक्सिजन वैद्यकीय कारणांसाठी राखीव ठेवायचे ठरविले आहे. केंद्राकडून आपल्याला इतर काही राज्यांतून ऑक्सिजन उपलब्ध करण्यास मान्यता दिली आहे मात्र, ही ठिकाणे खूप दूरवरची असल्याने तो ऑक्सिजन आणण्यासाठी रेल्वे, हवाई मार्गाने किंवा रस्ते मार्गे वाहनाने आणण्यासंदर्भात केंद्राला मदत करण्याची विनंती केली आहे. विशेषत: हवाई दलाच्या मदतीने हवाई मार्गे ऑक्सिजन आणता आला तर लवकर उपलब्धता होईल, असेही मुख्यमंत्री म्हणाले. यासाठी पंतप्रधानांना आपण पत्र लिहित असल्याचेही ते म्हणाले.
वाचा:
रेमडिसीवीर उपलब्धता
देशभरातील औषध उत्पादकांकडून रेमडीसीव्हीरचा पुरवठा व्हावा यासाठी प्रयत्न सुरू आहेत. संसर्ग कमी झाल्याने मधल्या काळात उत्पादन कमी झाले होते मात्र आता ते पूर्ववत होत असल्याची माहिती कंपन्यांनी दिली आहे, असेही ते म्हणाले.
पंतप्रधानांकडे मागणी
कोविडच्या पार्श्वभूमीवर आपण पंतप्रधानांकडे महत्त्वाच्या मागण्या केल्या आहेत असेही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. मार्च महिन्यामध्ये जीएसटी अर्थात वस्तू आणि सेवा कर परतावा दाखल करण्याची मुदत लघु आणि मध्यम उद्योजकांसाठी आणखी तीन महिन्यांनी वाढवता येऊ शकेल, असे ते म्हणाले. देशातील सर्व पक्षांच्या नेत्यांना पंतप्रधानांनी कोविड परिस्थितीत राजकारण न करण्याबाबत समज द्यावी असेही आपण सांगितल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. नैसर्गिक आपत्ती समजून मदत करणे गरजेचे आहे असेही ते म्हणाले.
वाचा:
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times