मुंबई: यांनी फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून राज्यातील जनतेशी संपर्क साधत १ मेपर्यंत संचारबंदी आणि कडक निर्बंध लागू करण्याची घोषणा केली. यावेळी त्यांनी राज्यातील कोरोनाच्या परिस्थिचे विदारक चित्र लोकांपुढे ठेवले. राज्यात ऑक्सिजनचा साठा अत्यंत अपुरा असल्याची गंभीर स्थिती मुख्यमंत्र्यांनी लोकांना सागितली. आता हा प्रश्न सोडवण्यासाठी मुख्यमंत्री थेट पंतप्रधांन नरेंद्र मोदी यांनाच पुरवठ्यासाठी फोनद्वारे तसेच पत्र पाठवून विनंती करणार आहेत. इतर राज्यातून लष्कराच्या मदतीने हवाईमार्गे ऑक्सिजनचा साठा आणण्यास परवानगी द्यावी, अशी विनंती मुख्यमंत्री पंतप्रधानांना करणार आहेत. (Chief Minister Uddhav Thackeray will request Prime Minister Modi for supply)

गेल्या चार दिवसांपासून राज्यात लॉकडाऊन लागू होण्याची जोरदार चर्चा आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या विषयावर सर्व पक्षीय नेत्यांशी चर्चा केल्यानंतर या चर्चेला अधिकच बळ मिळालं आहे. त्यातच आज दुपारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे रात्री राज्यातील जनतेशी संबोधित करणार असल्याचं वृत्त आल्याने मुख्यमंत्री काय बोलणार याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं होतं.

क्लिक करा आणि वाचा-
राज्यात ऑक्सिजनची उपलब्धता किती आहे आणि किती गरज आहे या संदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून माहिती दिली. राज्यात १२०० मेट्रिक टन ऑक्सिजनपैकी १००० मेट्रिक टन ऑक्सिजन कोरोना रुग्णासाठी वापरला जातो असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. पंतप्रधानांसोबत माझी नुकतीच बैठक झाली आहे. त्यात आपण ऑक्सिजनची मागणी केली असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. महाराष्ट्राला इतर राज्यातून ऑक्सिजन आणण्याची परवानगी देण्यात यावी अशी मागणी आपणत्यांच्याकडे केली असल्याचे ते म्हणाले. पंतप्रधानांनी तशी परवानगीही दिली आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.

क्लिक करा आणि वाचा-
मात्र, ही परवानगी ईशान्येकडील राज्यातून ऑक्सिजन आणण्यासाठी देण्यात आली आहे. यात खरी अडचण म्हणजे दररोज हजारो किलोमीटरचा प्रवास करून रस्ते मार्गे हे ऑक्सिजन आणावे लागणार आहे. परंतु आपल्याला ऑक्सिजनची मोठ्या प्रमाणात गरज आहे. त्यामुळे रस्तेमार्गे ऑक्सिजन आणणे परवडणारे नाही आणि त्या वेळेत आवश्यक तितका पुरवठा देखील होणार नाही. त्यामुळे लष्कराच्या मदतीने हवाईमार्गे ऑक्सिजन आणण्याची पंतप्रधानांनी परवानगी द्यावी अशी विनंती आपण पंतप्रधानाना करणार असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. त्यांनी फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून पंतप्रधानांना तसे आवाहनही केले आहे.

क्लिक करा आणि वाचा-
या मागणीसाठी आपण पंतप्रधानांना फोन करणार आहोत. कसेच त्यांना पत्र लिहूनही ही मागणी करणार आहोत, असेही मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here