वाचा:
या सदनिकांसाठी अर्ज करण्याच्या प्रक्रियेचे उद्घाटन गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते मुंबईत ऑनलाइन करण्यात आले. यावेळी गृहनिर्माण राज्यमंत्री सतेज पाटील, गृहनिर्माण विभागाचे प्रधान सचिव श्रीनिवास, ‘म्हाडा’चे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल डिग्गीकर हे सहभागी झाले होते. ‘’म्हाडा’ची लॉटरी योजना ही पारदर्शक आणि भ्रष्टाचारमुक्त असून, अफवा आणि फसवणुकीला बळी पडू नका. कोणी फसवणुकीचा प्रयत्न केल्यास संबंधितांविरूद्ध तक्रार करावी,’ असे आवाहन उपमुख्यमंत्री पवार यांनी केले.
वाचा:
दरम्यान, या दोन हजार ८९० सदनिका पुणे आणि शहरांसह सांगली, सोलापूर, सातारा आणि कोल्हापूर या भागांतील आहेत. ‘म्हाडा’च्या योजना आणि २० टक्के सर्वसमावेशक गृहनिर्माण योजनेंतर्गत या सदनिका आहेत. यापूर्वी ‘म्हाडा’ने जानेवारी महिन्यात पाच हजार ६५७ घरांची सोडत काढली होती.
अशी आहे लॉटरी प्रक्रिया…
– अर्ज करण्याचा कालावधी १३ एप्रिल ते १४ मे रात्री बारा वाजेपर्यंत
– ऑनलाइन अनामत रक्कम भरण्याची अंतिम मुदत १५ मे
– आरटीजीएस किंवा एनइएफटीद्वारे अनामत रक्कम भरण्याची मुदत १६ मे
– अर्ज भरणाऱ्यांची यादी प्रसिद्ध २६ मे
– अर्ज भरणाऱ्यांची अंतिम यादी प्रसिद्ध २८ मे
– ऑनलाइन लॉटरी सोडत २९ मे रोजी
वाचा:
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times