वाचा:
राज्यातील करोनाची स्थिती गंभीर बनली आहे. दररोज रुग्णसंख्या नवे उच्चांक गाठत आहे. या स्थितीत करोनाची साखळी तोडण्याची आवश्यकता लक्षात घेऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी १४ एप्रिल रोजी रात्री ८ वाजल्यापासून १ मे पर्यंत राज्यात लागू केली आहे. त्यासोबत लॉकडाऊनसारखेच कठोर निर्बंध राज्यात लागू करण्यात आले आहेत. हा निर्णय घेताना विविध घटकांसाठी आर्थिक पॅकेज जाहीर करण्यात आले आहे. या पॅकेजवर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस याच्यापाठापोठ प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनीही टीका केली.
वाचा:
राज्यात निर्बंधांची घोषणा करताना मुख्यमंत्र्यांनी सामान्य जनतेला मोठी मदत केल्याचे दाखवत शब्दांचे खेळ केले पण त्यांनी केलेल्या घोषणा फसव्या आहेत. अन्न सुरक्षा योजनेत ज्या गरीब कुटुंबाना स्वस्तात धान्य मिळते त्यांना दर महिना प्रतीकुटुंब केवळ १०५ रुपये त्यासाठी खर्च करावे लागतात. राज्य सरकारने या कुटुंबाना महिनाभरासाठी मोफत धान्य देण्याची घोषणा केली असली तरी प्रत्यक्षात प्रतीकुटुंब १०५ रुपयांचाच भार सोसलेला आहे. रिक्षाचालक साधारणपणे दरमहा दहा हजार रुपये कमवत असताना त्यांचे नुकसान भरून काढण्यासाठी अवघ्या दीड हजार रुपयांची घोषणाही अशीच पाने पुसणारी आहे. एकूणच हातावर पोट असणाऱ्यांना मदत करण्यासाठीच्या घोषणा फसव्या आहेत, असे चंद्रकांत पाटील म्हणाले.
वाचा:
सर्व काळजी घेऊन शक्य ते उद्योगधंदे सुरू ठेवण्याची परवानगी देत असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले असले तरी त्यांनी व्यापाऱ्यांविषयी काहीच उल्लेख केलेला नाही. राज्यात अत्यावश्यक सेवा वगळता सर्वकाही बंद ठेवण्याचा आदेश असल्याने त्याचा मोठा फटका व्यापाऱ्यांना बसणार आहे, असे पाटील म्हणाले खरेतर पुरेशी काळजी घेऊन व्यापाऱ्यांना काम करण्याची परवानगी दिली गेली पाहिजे होती, असे नमूद करताना केवळ निर्बंध लादायचे आणि फारशी मदतही करायची नाही असे या महाविकास आघाडी सरकारचे धोरण असून त्यामुळे अनेक कुटुंबे उद्ध्वस्त होण्याची भीती आहे, असे पाटील म्हणाले.
वाचा:
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times