मुंबईः राज्यात करोना संसर्गाचा उद्रेक झाला असून वाढत्या संसर्गावर नियंत्रण मिळवण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात आज रात्री ८ वाजल्यापासून कठोर निर्बंध लागू करण्याची घोषणा केली आहे. राज्यात याआधी लागू करण्यात आलेले निर्बंध अधिक कठोर करण्यात आले आहेत. तर, लग्न सोहळे व सार्वजनिक कार्यक्रमांवर मर्यादा लावण्यात आल्या आहेत.

करोनाची साखणी तोडण्यासाठी राज्यात आज रात्रीपासून कलम १४४ लागू करण्यात येणार आहे. १ मेपर्यंत हे आदेश लागू असणार आहेत. अशातच लग्न समारंभ व राजकीय सभा, सार्वजनिक कार्यक्रमांसाठी राज्यात नवे निर्बंध लागू करण्यात आले आहेत.

विकेंड लॉकडाऊन लागू झाल्यानंतर राज्यात लग्न समारंभासाठी ५० जणांना परवानगी देण्यात आली होती. मात्र, आता लग्न समारंभासाठी पाहुण्यांची संख्या निम्म्यावर आली आहे. आता फक्त २५ जणांच्या उपस्थितीत लग्न उरकावं लागणार आहे. तर, कोणत्याही धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक किंवा राजकीय कार्यक्रमांना परवानगी नाकारली आहे.

वाचाः

हॉलवरील कर्मचाऱ्यांचे लसीकरण किंवा आरटीपीसीआर चाचणी बंधनकारक आहे. किंवा करोना चाचणीचा निगेटीव्ह रिपोर्ट जवळ बाळगणे आवश्यक आहे. जर, कर्मचाऱ्यांचे लसीकरण व चाचणी झाली नसल्यास दंड आकारण्यात येणार आहे.

वाचाः

‘ब्रेक द चेन’च्या नियमांनुसार राजकीय सभांनाही परवानगी नाकारली आहे. तर, एखाद्या नियोजित निवडणुकीच्या प्रचारासाठी सभा घ्यायची असल्यास पक्षाला जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी घेण्याची आवश्यकता आहे. मात्र, सरकारच्या नियमांचे पालन करणं बंधनकारक असणार आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here