जळगाव जिल्ह्यात करोना संसर्ग वाढत आहे. दररोज हजारापेक्षा जास्त नवे रुग्ण आढळत आहे. तरी देखील शासनाने लागू केलेल्या ” च्या निर्देशांचे जळगावातील असंख्य नागरिकांडून पालन केले जात नसल्याचे चित्र आहे. रात्री संचारबंदी असतांना देखील अनेक नागरिक व टारगट चौकाचौकात विनाकारण फिरत असल्याने करोना संसर्ग वेगाने फैलावण्याची भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे आता जळगाव जिल्हा पोलिस दल अॅक्शन मोडमध्ये आले आहे. महापालिका प्रशासनाच्या मदतीने आता पोलिसांनी या रात्री विनाकारण फिरणाऱ्या टारगटांना धडा शिकविण्यासाठी मोहीम हातात घेतली आहे.
वाचाः
विनाकारण फिरल्यास स्पॉटवरच अँटीजेन चाचणी
जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंडे यांच्या आदेशानुसार संचारबंदीच्या काळात जे नागरिक रस्त्यावर फिरत असतील अशांची त्याच ठिकाणी रॅपिड अँटिजेन टेस्ट करण्यास सुरुवात केली आहे. संचारबंदीच्या काळात बाहेर निघणाऱ्यांवर धडा शिकवण्यासाठी पोलिस प्रशासनाने ही नामी शक्कल लढविली आहे. याची सुरवात जळगाव शहर आणि भुसावळमध्ये करण्यात आली आहे. नगरपालिकेतील डॉक्टर्स, वैद्यकीय कर्मचारी आणि पोलीस कर्मचारी यांच्यावतीने शहरातील अष्टभुजा चौकामध्ये संचारबंदीच्या कालावधीमध्ये नागरिक बाहेर फिरत आहेत अशा नागरिकांना पकडून त्यांची रॅपिड ॲटिजेन टेस्ट केली जात आहे.
वाचाः
जळगाव शहरातील काव्यरत्नावली चौकात रात्रीच्या वेळी असलेल्या प्रत्येक नागरीकाची टेस्ट करण्यात आली. यात सुमारे ८० जणांची जागेवरच चाचणी करुन त्यांचे रिपोर्ट्स तेथेच दाखविले. सुदैवाने सर्वांचीच चाचणी निगेटीव्ह आली. यावेळी पोलिस अधिक्षक डॉ. प्रवीण मुंडे स्वतः उपस्थित होते.
पाझिटीव्ह आल्यास कोविड केअर सेंटरमध्ये रवानगी
अँटीजेन चाचणी केल्यानतंर करोना पॉझिटिव्ह येणाऱ्या नागरिकांना तेथूनच डायरेक्ट कोविड केअर सेंटरमध्ये रवानगी केली जाणार आहे. जेणेकरुन पॉझिटीव्ह रुग्ण विलगीकरण कक्षात गेल्याने त्यांच्यापासून होणाऱ्या संसर्गाला आळा बसणार आहे.
वाचाः
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times