वाचा:
दिल्ली विधानसभा निवडणुकीची मतमोजणी आज होत आहे. मतमोजणीचे सुरुवातीचे कल पाहता आम आदमी पक्षानं दिल्ली पुन्हा राखल्याचं चित्र आहे. सीएए, एनआरसीसारख्या राष्ट्रवादाच्या मुद्द्यावरून भाजपनं दिल्लीत जोरदार प्रचार केला होता. भाजपची सत्ता येणारच असा प्रचार निकालाच्या आदल्या दिवसापर्यंत सुरू होता. मात्र, भाजपची पुरती पीछेहाट झाली आहे. आतापर्यंतच्या निकालानुसार ५८ जागी तर, अवघ्या १२ जागी आघाडीवर आहे. त्यामुळं भाजप बचावात्मक पवित्र्यात गेला आहे. ‘भाजपला अपेक्षित यश मिळालं नाही,’ अशी सावध प्रतिक्रिया मुनगंटीवार यांनी वृत्तवाहिन्यांशी बोलतांना व्यक्त केली.
‘मागील वेळी भाजपच्या तीन जागा होत्या. त्या आता १३ पर्यंत गेल्या आहेत. त्यामुळं अपेक्षित यश मिळालं नाही एवढंच म्हणता येईल,’ असं मुनगंटीवार म्हणाले. आम आदमी पक्षाला विकासकामांची पावती मिळाल्याचा दावा मुनगंटीवार यांनी खोडून काढला. ‘विकासकामावर लोकांनी मतं दिली असतील तर ‘आप’च्या जागा वाढायला हव्या होत्या. भारतीय जनता पक्षाला २०१४ मध्ये २८२ जागा मिळाल्या होत्या. आमच्या कामामुळं त्यानंतरच्या निवडणुकीत हा आकडा ३०३ वर गेला. ‘आप’चं तसं झालेलं नाही,’ असं मुनगंटीवार म्हणाले.
वाचा:
‘शाहीन बाग’ मुद्दा जनतेनं नाकारल्याचंही त्यांनी अमान्य केलं. ‘भाजपनं दिल्लीत अनेक मुद्द्यांवर प्रचार केला. शाहीन बाग हा त्यातील एक मुद्दा होता. त्यामुळं केवळ तोच मुद्दा होता आणि लोकांनी तो नाकारला असं म्हणणं चुकीचं आहे,’ असं ते म्हणाले.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times