मुंबई: राज्यात फोफावणाऱ्या करोना संसर्गावर नियंत्रण मिळवण्यासाठी यांनी १५ दिवसांची संचारबंदी आणि कडक निर्बंध लागू केले आहेत. यात अत्यावश्यक सेवा सुरू ठेवतानाच गरिबांसाठी शिवभोजन केंद्र सुरू ठेवण्याची घोषणा केली आहे. यावर माजी खासदार आणि भाजप नेते यांनी जोरदार टीकास्त्र सोडले आहे. (shiv bhojan former mp criticizes over shiv bhojan centres)

एका ट्विटद्वारे नीलेश यांनी यांनी महाविकास आघाडी सरकारच्या या निर्णयावर प्रहार केला आहे. १५ दिवसांच्या या कडक निर्बंधांच्या काळात राज्यात गरिबांना अन्न मिळावे यासाठी सुरू राहणार आहेत. विशेष म्हणजे ही शिवभोजन थाळी मोफत दिली जाणार आहे. यावर नीलेश राणे यांनी टीका केली आहे. ‘राज्यातील शिवभोजन केंद्रे उघडी राहणार. याचे कारण म्हणजे ही केंद्रे शिवसेनेचे कार्यकर्ते चालवतात. पण इतरांची रेस्टॉरंट्स मात्र बंद राहणार. घराबाहेर जाऊन पार्सल घ्या, करोना होणार नाही. रिक्षा आणि टॅक्सी फिरू द्या, पण तुम्ही मात्र फिरू नका. मुंबईच्या बिल्डरांना मदत करताना हजार कोटी, पण गरिबांना मदत करताना मात्र पाचशे- हजार’, अशा शब्दात नीलेश राणे यांनी सरकारवर हल्लाबोल केला आहे.

क्लिक करा आणि वाचा-

१५ दिवसांची संचारबंदी लागू करत असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महिन्याभरासाठी गरिबांना प्रतिव्यक्ती ३ किलो गहू आणि २ किलो तांदूळ देण्याचा निर्णय जाहीर केला आहे. हे वितरण सर्वांना करता यावे यासाठी राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी पंतप्रधान मोदी यांना पत्र लिहून मदतीची मागणी केली आहे. यावर देखील नीलेश राणे यांनी टीका केली आहे.

क्लिक करा आणि वाचा-

ते आपल्या ट्विटमध्ये म्हणतात, ‘मंत्री छगन भुजबळांचे पंतप्रधान नरेंद्र मोदींजीना लिहिलेले पत्र बघा. १ महिना गरिबांना प्रतिव्यक्ती ३ किलो गहु व २ किलो तांदुळ द्यायची घोषणा केली आणि लगेच केंद्राकडे भीकेची मागणी पण केली. उद्या पासून राज्याचे मंत्री ७.४५ ची सोय पण केंद्राकडे मागतील, काय सांगता येत नाही.’


क्लिक करा आणि वाचा-

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here